Pune Crime News | दरोड्याच्या तयारीत असलेल्या 9 जणांच्या टोळीला डेक्कन पोलिसांकडून अटक ! कोयता, चाकू जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जंगली महाराज रोडवरील (JM Road Road) पेट्रोल पंपावर दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या 9 जणांच्या टोळीला डेक्कन आणि शिवाजीनगर पोलिसांनी (Pune Police) सापळा रचून अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून लोखंडी कोयता, चाकू तसेच दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. डेक्कन पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime News) मंगळवारी (दि.4) संभाजी उद्यानाच्या मागील मुठा नदीपात्रात केली.

गौतम उर्फ लखन अंबादास बनसोडे Gautam Alias Lakhan Ambadas Bansode (वय-29 रा. पीएमसी कॉलनी, राजेंद्रनगर), राम विलास लोखंडे Ram Vilas Lokhande (वय-23 रा. नवी पेठ, पुणे), सुनिल बाबासाहेब कांबळे Sunil Babasaheb Kamble (वय-20 रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर), अश्रु खंडु गवळी Ashru Khandu Gawli (वय-19 रा. दांडेकर पुल), रोहित चांदा कांबळे Rohit Chanda Kamble (वय-19), रोहन किरण गायकवाड Rohan Kiran Gaikwad (वय-19 पाटील इस्टेट, शिवाजीनगर), किरण सिताप्पा खेत्री Kiran Sitappa Khetri (वय-20 रा. कात्रज), ओंकार बाळु ननावरे
Omkar Balu Nanavare (वय-21 रा. राजेंद्रनगर,पुणे), शाम विलास लोखंडे Sham Vilas Lokhande (वय-20 रा. नवी पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) आयपीसी 399 नुसार गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime News)

डेक्कन पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलींग करत असताना माहिती मिळाली की, संभाजी उद्यानाच्या (Sambhaji Park Pune) पाठीमागे मुठा नदीपात्रात 9 ते 10 जण दारुपीत बसले आहेत. त्यांच्याकडे कोयते आणि धारदार शस्त्रे असून ते जंगली महाराज रोडवरील साई पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याची चर्चा करत आहेत. याबाबत शिवाजीनगर पोलिसांना माहिती देऊन त्यांच्याकडील स्टाफला नदीपात्रात येण्यास सांगितले. दरम्यान डेक्कन पोलिसांनी साध्या वेशात नदीपात्रात जाऊन सापळा रचला. डेक्कन आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील (Shivajinagar Police Station) पोलिसांनी आरोपींना घेराव घालून रात्री दीड वाजता ताब्यात घेतले. आरोपींची अंगझडती घेतली असता लोखंडी कोयता, चाकू, मिरचीपुड, नायलॉन दोरी, मास्क जप्त केले.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल (IPS Sandeep Singh Gill), सहायक पोलीस आयुक्त वसंत कुवर (ACP Vasant Kuwar), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस (Sr PI Vipin Hasbanis), पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर साळुंखे (PI Shankar Salunkhe) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अहिवळे (API Ahiwale), पोलीस उपनिरीक्षक मीरा कवटीकवार (PSI Meera Kavtikwar), डेक्कन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिंदे पोलीस अंमलदार गभाले, बोरसे, गायकवाड, पिटर मोबाईल चालक तांबे, बालगंधर्व मार्शल सोनवणे, तरंगे, प्रभात मार्शल कौटकर, मस्के, इनामदार, बागुले यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime News | Deccan police arrested a gang of 9 people who were preparing for a robbery! Koyta, knife seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | ‘कोणता पक्ष? कोणता विचार? अन् कसली निष्ठा?’ रोहित पवारांचे खोचक ट्विट; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले ‘ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली…’

Actress Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूर पडली आहे प्रेमात; बॉलीवुडच्या ‘या’ व्यक्तीसोबत अफेअरच्या चर्चा

Pune Crime News | कमी किंमतीचे हिरे जास्त किंमतीला देवून 3 कोटी 48 लाखांची फसवणूक ! तनिष्क शोरूममधील सेल्समनला अटक; मॅनेजर, कॅशिअर, बिझनेस मॅनेजर आणि शोरूमच्या मालकाविरूध्द गुन्हा

Chhagan Bhujbal | ‘साहेबांनी मला बोलवलं तर मीपण…’, छगन भुजबळांचं मोठं विधान

Pune Crime News | ‘आयुष’च्या प्रवेश परीक्षेच्या क्लासच्या नावाखाली महिलेशी अश्लिल वर्तन; शिक्षकावर गुन्हा दाखल

Monsoon Update | अनेक राज्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज