Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून पाटसला दुहेरी खून; तलवारीने सपासप वार करून आणि दगडाने ठेचून संपवलं

पुणे न्युज (Pune news) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Pune Crime News | पुणे जिल्ह्यातील दौंड (Daund) तालुक्यातील पाटस (Patas) येथे पूर्ववैमनस्यातून टोळक्याने दोघांचा तलवार, काठ्या आणि दगडाने मारहाण करुन खुन (murder) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गणेश रमेश माखर (Ganesh Ramesh Makhar) (वय २३) आणि शिवम संतोष शितकल (Shivam Santosh Shitkal) (वय २३, दोघे रा. आंबिकानगर, पाटस, ता़ दौंड) असे खुन झालेल्यांची नावे आहेत. पाटस (Patas) येथील तामखंडा (Tamkhanda) येथे रविवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. याप्रकरणी यवत पोलिसां (Yavat Police) नी महेश संजय भागवत (Mahesh Sanjay Bhagwat), मोहन टुले (Mohan Tule), योगेश शिंदे (Yogesh Shinde) व त्यांच्या इतर ३ ते ४ जणांवर खुनाचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे. Pune Crime News | double murder in patas near yavat in pune district

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

गणेश माखर(Ganesh Ramesh Makhar), शिवम शितकल (Shivam Santosh Shitkal) यांचे यापूर्वी महेश भागवत (Mahesh Sanjay Bhagwat) व इतरांशी भांडणे झाली होती. भागवत याच्या मोबाईल फोनवरुन गणेश माखर याला आई, बहिणीवरुन शिवीगाळ केली होती. त्याचा जाब विचारण्यासाठी गणेश व शिवम हे रविवारी रात्री १० वाजता तामखंडा येथे गेले होते. यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. तेव्हा भागवत, टुले, शिंदे व त्यांच्या ३ ते ४ साथीदारांनी या दोघांवर तलवार, काठ्या आणि दगडाने मारहाण करुन त्यांचा निर्घुण खुन केला. त्यानंतर ते पसार झाले.

या घटनेची माहिती मिळाल्यावर यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले़ हल्लेखोर टोळक्याचा यवत पोलीस शोध घेत असून पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील अधिक तपास करीत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

 

Web Title : Pune Crime News | double murder in patas near yavat in pune district

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या तिप्पट, जाणून घ्या आकडेवारी

BJP-Shivsena Alliance | भाजप-शिवसेना एकत्र येणार का?, फडणवीसांचं सूचक विधान अन् चर्चेला उधाण (व्हिडिओ)

Pimpri Corona News : पिंपरी चिंचवड शहरात आज 259 नवीन रुग्णांची नोंद, 205 ‘कोरोना’मुक्त रुग्णांना डिस्चार्ज