Pune Crime News | दुचाकीवरुन जाताना विजेचा खांब डोक्यावर पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

पुणे / मंचर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | दुचाकीवरुन कामावर जात असताना तरुणाच्या डोक्यात व छातीवर विजेचा खांब पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर पाठीमागे बसलेला तरुण जखमी झाला आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील साकोरे येथे शुक्रवारी (दि.8) सकाळी घडली. विशाल संतोष ढगे (वय-23 रा. साकोरे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अजित साहेबराव मोढवे हा तरुण जखमी झाला आहे. विशालच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (Pune Crime News)

विशाल आणि अजित हे दोघे मंचर येथील उद्योजक सतीश बेंडे पाटील यांच्याकडे कामाला आहेत. आज सकाळी नऊच्या सुमारास ते दोघे दुचाकीवरुन वडगाव काशिंबेग मार्गे मंचरला जात होते. साकोरे गावाच्या हद्दीत दत्तात्रय भिकाजी मोढवे यांच्या रस्त्यालगत असलेल्या शेताच्या बांधावर तीन दिवसांपूर्वी सिमेंटचा विजेचा खांब उभा केला होता. काल रात्रीपासून सतत पाऊस पडत असल्याने हा खांब अचानक रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी तेथून जात असलेल्या विशालच्या डोक्यात व छातीवर खांब पडला. यामध्ये विशालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. (Pune Crime News)

अजित मोढवे याने या अपघाताबाबत गावातील लोकांना फोन करुन माहिती दिली. ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विशाल याला उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषीत केले. या घटनेत अजित मोढवे हा जखमी झाला असून त्याच्यावर मंचर येथे उपचार सुरु आहेत.

पोलीस हवालदार राजेंद्र हिले व विलास साबळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशाल हा प्रेमळ स्वभावाचा असल्याने तो
सर्वांच्या परिचयाचा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radhakrishna Vikhe Patil | धनगर आरक्षणावरुन राधाकृष्ण विखे पाटलांवर टाकला भंडारा, प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले… (व्हिडिओ)

हिंजवडी आयटी पार्कमध्ये मेफेड्रॉन, अफू विकणारे दोन राजस्थानी गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई

Wagle Ki Duniya | सोनी सबवरील वागले की दुनिया मालिकेतील परिवा प्रणती ऊर्फ वंदना म्हणाली,
भय आणि लोकलज्जेला मागे टाकून ब्रेस्ट कॅन्सरवर खुलेपणाने चर्चा करणे महत्त्वाचे आहे

Pashmina – The Thread Of Love | सोनी सबवरील पश्मिना मालिकेत निशांत मलकानी साकारणार व्यवहारचतुर दिग्गज उद्योगपती राघवची भूमिका