Pune Crime News | प्रेमविवाहानंतरही संशय घेतल्याने विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : Pune Crime News | ते मुळचे यवतमाळचे, दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याने त्यांनी गुपचूप प्रेमविवाह (Love Marriage) केला. ती शिक्षणासाठी पुण्यात राहु लागली. त्याला कायमच तिच्याविषयी संशय होता. त्यातून तो तिला मारहाण (Beating) करीत, तिचा फोन नंबर त्याने ब्लॉक केला. त्यामुळे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. (Pune Crime News)

समिक्षा माने (वय २२) असे या विवाहितेचे नाव आहे. याबाबत राहुल देवराव माने (वय ४८, रा. आंबेडकरनगर, यवतमाळ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६७/२३) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अविनाश कुरेवार (रा. पांढरकवडा, जि. यवतमाळ) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार कात्रज येथील संतोषनगरमधील घुंगरुवाले चाळीत ८ जानेवारी रोजी घडला होता. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी समिक्षा माने हिने फिर्यादी यांना काहीही माहिती
न देता अविनाश कुरेवार याच्याबरोबर लग्न केले. त्यानंतर ती मैत्रिणीबरोबर शिक्षणासाठी पुण्यात राहु लागली.
तो यवतमाळला रहात होता. आपण लग्न केल्याचे तिने घरी सांगितले होते. लग्नानंतरही अविनाश याला संशय होता.
समिक्षा दुसर्‍या कुठल्यातरी मुलासोबत बोलते व फिरते असा संशय घेऊन तो तिला वारंवार फोनवरुन शिवीगाळ
करुन मारहाण करीत असे. तिला टॉर्चर करुन तिचा फोन नंबर ब्लॉक केला होता.
त्यामुळे आलेल्या दडपणामुळे समिक्षा माने हिने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास
घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Web Title :-Pune Crime News | Even after a love marriage, a married woman committed suicide by hanging herself due to suspicion

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ratnagiri Crime | दुर्दैवी! दुचाकीवरून पडून महिला शिक्षिकेचा मृत्यू

Pune Crime News | कल्याणीनगरमध्ये व्यावसायिकाने केला शेकोटी करणाऱ्यांवर गोळीबार; ‘‘भैय्या कहा के हो’’ विचारल्याने रागात केला गोळीबार, तरुणांनी फोडली कार

Satara Crime News | सातार्‍यात व्यावसायिकाची ६ गोळ्या झाडून हत्या

MNS Chief Raj Thackeray | मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली, राज ठाकरेंनी दिला बाळासाहेबांच्या आठणवणींना उजाळा