Pune Crime News | भररस्त्यात तरुणीची छेड काढून मारहाण, विनयभंग करणाऱ्या दोघांवर FIR; पुण्यातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भररस्त्यात तरुणींची छेड काढून विनयभंग (Molestation Case) केल्याची धक्कादायक घटना आंबेगाव पठार परिसरात घडली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime News) 19 ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास घडला आहे.

शिवम मेघावत (Shivam Meghawat) आणि पियुष भरम Piyush Bharam (रा. आंबेगाव पठार) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबात पीडित मुलीच्या आईने (वय 27) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. (Pune Crime News) पोलिसांनी आरोपींवर आयपीसी 354, 354(ड), 324, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या मैत्रिणी सोबत मेडिकल मध्ये जात होत्या.
त्यावेळी दोन तरुणांनी त्यांचा पाठलाग करुन फिर्यादी यांच्या मुलीला ‘तुला मी घरी सोडतो’ असे म्हणाले.
त्यावरून आरोपी आणि महिला यांच्यात वाद झाला. यावरुन पियुष भरम याने महिलेच्या मुलीच्या कानाखाली मारून शिवीगाळ केला. तसेच शिवम मेघावत याने मुलीच्या हाताला धरून शिवीगाळ करत, तिला जवळ ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावेळी फिर्यादी यांच्या मैत्रीणीचे आई-वडील येत असल्याचे पाहून आरोपी पळून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil On Katraj Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा ! वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने 125 वॉर्डनची नियुक्ती करा!

पुण्यातील फार्म हाऊसवर सापडले बिबट्याचे अवयव, दोन बड्या उद्योजकांवर FIR

Pune Crime News | अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 3 जणांना गुन्हे शाखेकडून अटक, 1 कोटी 16 लाखांचे अफीम जप्त

2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket | दुसरी ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा