Pune Crime News | हिंदु देवतांबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सिम्बायोसिस कॉलेजमधील प्राध्यापक अशोक ढोले याच्याविरुद्ध FIR

सिम्बॉयसिस कॉलेज प्रशासनाकडून अशोक ढोलेवर निलंबनाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हिंदू देवतांविषयी (Hindu Gods) वादग्रस्त वक्तव्य (Controversial Statement करणारे प्राध्यापक अशोक सोपान ढोले Professor Ashok Sopan Dhole (वय-43 रा. धायरी फाटा, वडगांव बुद्रुक) याच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) आयपीसी 295 अ नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत पुणे शहर समस्त हिंदु बांधव संघटनेचे अध्यक्ष रविंद्र दिलीप पडवळ (Ravindra Dilip Padwal) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News) तर दुसरीकडे कॉलेज प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्राध्यापक अशोक ढोले याला निलंबित (Suspended) केले आहे.

अशोक ढोले याने सिम्बायोसिस कॉलेजमध्ये (Symbiosis College) 12 वीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना हिंदू देवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होते. ढोले याने हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माच्या देवदेवतांचं उदाहरण देत आक्षेपार्ह विधान केलं आहे. या प्राध्यापकांचा शिकवतानाचा व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये हिंदू देवांसंदर्भात त्याने वक्तव्य केलं होतं. हा व्हिडिओ पाहून अभाविपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर कॉलेज प्रशासनाने व्हिडीओची शहानिशा करुन प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई केली आहे. (Pune Crime News)

दरम्यान अशोक ढोले याच्याविरुद्ध डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक ढोले याने 25 जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास इयत्ता 12 वी वर्गाचा क्लास सुरु असताना हिंदू देवदेवतां विषयी वादग्रस्त विधान केले. त्याने हिंदू देवी देवतांचा एकेरी उल्लेख केला. तसेच आक्षेपार्ह भाष्य करुन हिंदू धर्माचा अवमान केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विपीन हसबनीस (Sr PI Vipin Hasabnis) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर साळुंखे (PI Shankar Salunkhe) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | खळबळजनक! पुणे जिल्ह्यातील ‘या’ बँक ऑफ महाराष्ट्रच्या
शाखेत तब्बल 1 कोटी 73 लाखांचा अपहार

Pune News | आज “अजिंठ्या ” च्या लेण्यांनाही दाटून आलं…..