Pune Crime News | पुण्यात पत्रकारावर गोळीबार; पंधरा दिवसात दुसर्‍यांदा हल्ला, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | वैयक्तिक दुश्मनीतून एका पत्रकारावर गेल्या 15 दिवसात दुसर्‍यांदा हल्ला (Attack on Journalist In Pune) होण्याचा प्रकार समोर आला आहे. रविवारी रात्री दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी या पत्रकारावर गोळीबार (Firing In Pune) करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला. (Pune Crime News)

हर्षद कटारिया (journalist Harshad Katariya) असे या पत्रकाराचे नाव आहे. ते पुण्यातील एका दैनिकामध्ये उपनगर वार्ताहर म्हणून काम पहातात.

याबाबत स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) दिलेल्या माहितीनुसार, हर्षद कटारिया हे सातारा रोडजवळील अतिथी हॉटेलजवळील (Atithi Hotel Satara Road) आपल्या घरी जात होते. सोसायटीच्या दारात ते आले असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या दिशेने पिस्तुल रोखून फायरिंग (Firing On journalist) केले. त्यांनी मान खाली केल्याने हल्लेखोरांचा नेम चुकला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. (Pune Crime News)

या घटनेनंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, तेथे कोणतीही पुंगळी आढळून आली नाही. सुमारे 15 दिवसांपूर्वी हर्षद कटारिया याच्यावर अशा प्रकारे रस्त्यात गाठून तिघांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून धमकी दिली होती. ती घटना दि. 28 मे 2023 रोजी घडली होती. त्यावेळी देखील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याच गुन्हयात भादंवि 307 चे कलम वाढविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हर्षद कटारिया यांनी अनेकांच्या बेकायदा बांधकामाबाबत महापालिकेत
Pune Municipal Corporation अर्ज करुन त्यांचे बांधकाम पाडायला लावले.
त्यांच्या वडिलोपार्जित जागेबाबतही वाद सुरु आहे. त्यातून हा प्रकार घडल्याची शक्यता असून पोलीस तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Firing On journalist Harshad Katariya In Swargate Police Station Limits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | आज पुण्यातील सोन्या-चांदीचा दर किती? जाणून घ्या

Biporjoy Cyclone Update | बिपोरजॉय भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता; ‘IMD’ चा इशारा

NCP Chief Sharad Pawar | शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून आयटी इंजिनिअरला अटक