Pune Crime News | पुणे विमानतळावर दीड कोटींचे परकीय चलन जप्त, सीमा शुल्क विभागाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या (Central Customs Department) पथकाने पुणे विमानतळावर (Pune Airport) तब्बल दीड कोटी रुपयांचे परकीय चलन जप्त (Foreign Currency Seized) केले आहे. याप्रकरणी चार जणांना ताब्यात (Pune Crime News) घेण्यात आले. प्रोफाइलिंगच्या आधारे दोन वेगवेगळ्या प्रकरणात हे परकीय चलन सीमा शुल्क विभागाने जप्त केले आहे.

सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी पुण्याहून दुबईला (Dubai) जाणाऱ्या एका प्रवाशाला (Passenger) ताब्यात घेत त्याच्याकडून 9 लाख 22 हजार रुपये किमतीचे संयुक्त अरब अमीरात दिरहम Arab Emirates Dirham (AED) हे विदेशी चलन जप्त केले. (Pune Crime News)

तर दुसऱ्या कारवाई 31 जुलै रोजी करण्यात आली.
यामध्ये दुबईला जाणाऱ्या तीन प्रवाशांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 1 कोटी 41 लाख 11 हजार 578 किमतीचे संयुक्त अरब अमिराती दिरहम चलन जप्त करण्यात आले. या प्रवाशांनी मर्यादेपेक्षा जास्त रक्कमेचे परकीय चलन जवळ बाळगले होते. त्यामुळे सीमा शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sai Tamhankar | अभिनेत्री सई ताम्हणकरने सांगितल्या तिच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Govt News | राज्यातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील
19 हजार 460 पदांची मेगा भरती; जाहिरात उद्याच

Maharashtra Assembly Session 2023 | ‘आम्हाला खोके म्हणणाऱ्यांनीच 50 कोटी देण्यासाठी पत्र पाठवलं’, एकनाथ शिंदेंचा खळबळजनक दावा (व्हिडीओ)