Pune Crime News | राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडेंना पोलीस कोठडी, 44 जणांची 5 कोटींची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शिक्षक, आरटीओ तसेच नोकरी लावण्याच्या आमिषाने (Lure of Job) 44 जणांकडून तब्बल 4 कोटी 85 लाख उकळल्याच्या आरोपावरून अटक (Arrest) करण्यात आलेल्या राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त (State Examination Council Commissioner) शैलेजा रामचंद्र दराडे Shailaja Ramchandra Darade (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण, सुसरोड) यांना पुणे लष्कर न्यायालयाने (Lashkar Court) 12 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. (Pune Crime News)

शैलजा दराडे यांनी 2019 साली नोकरी लावण्याच्या आमिषाने 44 लोकांकडून पैसे स्वीकारले. तलाठी (Talathi) आणि आरटीओ परीक्षेत (RTO Exam) पास करण्याचे आमिष दाखवले आणि वेगवेगळ्या नागरिकांकडून जवळपास 4 कोटी 85 लाख रुपये स्वीकारले. यासंदर्भात त्यांचे काही ऑडिओ जप्त केले आहेत. या ऑडिओमधील आवाजाची सत्यता तपासून पाहण्यासाठी पोलिसांनी शैलजा दराडे यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी (Public Prosecutor) न्यायालयात केली होती. (Pune Crime News)

दराडे प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) म्हणून काम पाहत असताना त्यांनी पदाचा गैरवापर करत नोकरी लावण्याचे आश्वासन देऊन कोट्यवधींचा अपहार केल्याचे सरकारी वकिलांनी युक्तिवादादरम्यान सांगितले.
तसेच हुशार विद्यार्थ्यांना डावलून त्यांनी पैसे घेतले आहेत, ज्यांची पात्रताही नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांनी नोकरी
देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी अशा प्रकारे पैशाच्या अमिषाने आणखी काही लोकांना नोकरी लावली का? याचा तपास करण्यासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानंतर न्यायालयाने दराडे यांना 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान यापूर्वी याप्रकरणात शैलजा दराडे यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे Dadasaheb Ramchandra Darade
(रा. अकोले, ता. इंदापूर) याला 4 एप्रिल रोजी अटक केली होती. या दोघांवर हडपसर पोलीस ठाण्यात
(Hadapsar Police Station) संगणमत करुन फसवणूक (Fraud) व अपहार (Embezzlement) केल्याचा गुन्हा (FIR)
दाखल केला आहे. याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी Popat Sukhdev Suryavanshi (वय-50 रा. मु.पो. खानजोडवाडी,
ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | डाबर ओडोमोसने डेंग्यू मुक्त भारत मोहीम सुरू केली; डेंग्यू आणि मलेरियापासून बचाव करण्याबाबत जनजागृती

ACB Trap News | 15 हजार रूपयाची लाच घेताना कार्यालयीन अधीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात