Pune Crime News | बँकेची बनावट रिसिट पाठवून कॅनडातील नातेवाईकाच्या नावाने घातला गंडा; मनी ट्रान्सफरमधील कालावधीचा घेतला फायदा

पुणे : Pune Crime News | कॅनडामध्ये असलेल्या नातेवाईकाने व्हिसा नुतनीकरणासाठी पैसे पाठविले असून त्याची बँकेची बनावट रिसिट (Fake Receipt) पाठवली. एजंटाला हे पैसे पाठवा, असे सांगून एका कुटुंबाला तब्बल ३ लाख ७० हजार रुपयांना सायबर चोरट्यांनी (Pune Cyber News) गंडा (Cheating Case) घातला आहे. (Pune Crime News)

याबाबत येरवडा येथे राहणार्‍या एका ३८ वर्षाच्या नागरिकाने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६३५/२३) दिली आहे. परदेशातून मनी ट्रान्सफरमार्फत (Money Transfer) पैसे पाठविल्यास ते जमा होण्यास २४ तासाचा कालावधी लागू शकतो, याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या आईचे अनेक नातेवाईक दुबई, कॅनडा येथे राहतात. एके दिवशी त्यांना फोन आला. त्याने मुलगा परदेशातून बोलत असल्याचे सांगून तो आईच्या परिचयाचा आहे, असे म्हणून आईला ओळखण्यास सांगत होता. आईने अनेक नातेवाईकांची नावे घेतली. तेव्हा फोनवर बोलणार्‍या मुलाने मी रिंकुच बोलत असल्याचे सांगितले. एका एजंटच्या मार्फत कॅनडाला जॉबसाठी आलो आहे. व्हिसाची मुदत आज संपणार आहे. व्हिसाची मुदत न वाढविल्यास मला एजंट परत भारतात पाठवून देईल, तरी आपण मला व्हिसा मुदत वाढविण्यासाठी ३ लाख ७० हजार रुपयांची मदत करा, असे तो बोलत होता. फिर्यादीकडे आईने फोन दिला.

फिर्यादी यांना तो आईच्या ओळखीचा आहे, असे वाटून ते बोलत राहिले. त्यानंतर त्यांनी माझे आणि एजंटचे भांडणे झाले आहे. त्यामुळे तुम्ही एजंटला पैसे पाठवा, असे सांगितले. त्यानंतर त्याने आईच्या व्हॉटसअपवर वेस्टन युनियन (Weston Union) या मनि ट्रान्सफर द्वारे ६ लाख ४५ हजार ४३६ रुपये त्यांच्या बँक खात्यावर पाठविल्याची रिसीट पाठविली. फिर्यादी यांनी कोरेगाव पार्क येथील वेस्टन युनियन मनिट्रान्सफरच्या (Weston Union MoneyTransfer) कार्यालयात भेट दिली असता त्यांनी हे पैसे २४ तासात बँक खात्यात जमा होतील, असे सांगितले. त्यापाठोपाठ एजंटाचा वारंवार फोन येऊन पैसे ताबडतोब पाठवा, असा त्याने लगादा लावला. (Pune Crime News)

पैसे २४ तासात जमा होणार असल्याची खात्री झाल्याने फिर्यादी यांनी पत्नी व स्वत:च्या खात्यातून
भोपाळ येथील सागर सिंग या एजंटला ३ लाख ७० हजार रुपये पाठविले.
त्यानंतर त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा न झाल्याने त्यांनी त्या एजंटला फोन करुन पैसे परत करण्यास सांगितले.
तेव्हा त्याने आणखी पैशांची मागणी करुन पैसे परत करण्यास टाळाटाळ केली.
आपली फसवणूक (Fraud) झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी
सायबर पोलिसांकडे (Pune Cyber Police) तक्रार केली होती.
सायबर पोलिसांनी प्राथमिक तपास करुन हा गुन्हा येरवडा पोलिसांकडे हस्तांतरीत केला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | दिवे घाटात टेम्पो उलटून १२ कामगार जखमी