Pune Accident News | दिवे घाटात टेम्पो उलटून १२ कामगार जखमी

पुणे : Pune Accident News | बिल्डिंग मेटेरियल (Building Materials) घेऊन पुण्याकडे येत असताना दिवे घाटात एक टेम्पो उलटल्याने त्यातील १२ कामगार जखमी झाले. हा अपघात दिवे घाटातून (Dive Ghat) पुण्याकडे येताना दुसर्या वळणावर सकाळी पावणे नऊ वाजता घडला. (Pune Accident News)
याबाबत अग्निशामन दलाच्या (Fire Brigade) वतीने सांगण्यात आले की, टेम्पो सासवडकडून आरसीसी स्लॅब टाकण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन पुण्याकडे येत होता. दिवे घाटातील दुसर्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला टेम्पो उलटला. त्यातील सर्व साहित्य आतील कामगारांच्या अंगावर पडले. घाटातून जाणार्या नागरिकांनी तिकडे धाव घेत हे साहित्य बाजूला करुन आतील कामगारांना तातडीने मिळेल, त्या गाडीने सासवड येथील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. या अपघातात १२ कामगार किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. (Pune Accident News)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Ganeshotsav 2023- Fire Brigade | पुणे शहरात गणपती उत्सवानिमित्त अग्निशमन दल घेणार
“अग्निसुरक्षित गणेश मंडळ” आढावा; मंडंळाना नोंदणी करण्याचे आवाहन
Nana Patole | ‘मुख्यमंत्र्यांनीच जरांगेंना उपोषणाला बसवलं आणि गृहमंत्र्यांनी…’ नाना पटोलेंचा आरोप