Pune Crime News | एसबीआय क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक, कोथरुड मधील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | एसबीआय क्रेडिट कार्ड विभागातून (SBI Credit Card Department) बोलत असल्याचे सांगून एका ज्येष्ठ नागरिकाची दोन लाखांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 3 मे 2023 ते 15 मे 2023 या कालावधीत कोथरुड येथे घडला आहे. या प्रकरणी (Pune Crime News) अनोळखी मोबाईल धारकावर गुन्हा (Pune Police) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुरेश महादेव साळुंके Suresh Mahadev Salunke (वय-64) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 9718601364 या मोबाईल धारकावर तसेच बँक खाते धारकावर आयपीसी 419, 420, आयटी अॅक्ट (IT Act) प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी मोबाईल धारकाने फिर्यादी यांच्या मोबाईलवर संपर्क साधला.
आरोपीने एसबीआय क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
जुने क्रेडिट कार्ड बंद करुन नवीन क्रेडिट कार्ड मिळाल्यानंतर त्यावरील फिर्यादी यांचे नाव, मोबाईल क्रमांक,
क्रेडीट कार्ड वरील क्रमांक बरोबर आहे का, अशी विचारणा केली.
यानंतर फिर्यादी यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर (OTP) घेतला.
ओटीपी नंबर घेऊन आरोपीने फिर्यादी यांची 2 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Senior PI Hemant Patil) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | ‘भाजपने मराठा समाजाची माफी मागावी’, सुप्रिया सुळेंच्या मागणीवर चित्रा वाघ यांचा पलटवार, म्हणाल्या-‘तुम्ही खरंच प्रयत्न केले असते तर…’

Jalna Lathi Charge | जालना लाठीचार्जवर राज ठाकरे म्हणाले ‘मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी…’

Retired ACP Anis Kazi Passed Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी यांचे निधन

Thane Crime News | माजी महापौराच्या भावाने गोळी झाडून पत्नीचा केला खून; त्यानंतर भावाचाही मृत्यु

Diabetes and Infertility | डायबिटीजमध्ये प्रजनन क्षमतेवर होतो परिणाम, जाणून घ्या पुरुषांनी कोणती काळजी घ्या