Pune Crime News | सोलर पंपाचे अनुदान मिळवून देण्याच्या आमिष दाखवून तिघांची फसवणूक; इंदापूर पोलीस ठाण्यात स्वप्नील बंडगर व विजय बंडगर यांच्यावर FIR

पुणे : Pune Crime News | शासनाच्या कुसुम योजनेतून सोलर पंपाचे अनुदान मिळाले आहे. २० टक्के रक्कम भरली की सोलर पंप शेतावर बसवून देण्याचे आमिष दाखवून तिघांची २ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील एका ३७ वर्षाच्या शेतकर्‍याने इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी स्वप्नील विठ्ठल बंडगर व विजय विठ्ठल बंडगर (दोघे रा. वडापूरी, ता. इंदापूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची तरंगवाडी येथे शेती आहे. त्यांनी शेतीमध्ये लाईट व्यवस्थित चालत नसल्याने सोलर कृषी पंपासंदर्भात माहिती घेत असताना त्यांना स्वप्नील बंडगर हे सोलरचे कनेक्शन देत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी इंदापूर येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. त्याने मी पुण्यातील कंपनीमार्फत तुमच्या शेतीमध्ये शासकीय कुसुम योजनेअंतर्गत ८० टक्के अनुदानावर सोलर कृषी पंप बसवून देतो, असे सांगितले. फिर्यादी, त्यांचा चुलत भाऊ, चुलते यांची आधार कार्ड व इतर कागदपत्रे तसेच प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे ८ हजार रुपये घेतले. त्यांच्याकडून फॉर्म भरुन घेतले.

त्यानंतर काही दिवसांनी तुमचे अनुदान मंजूर झाले आहे. तुम्हाला शासनाचे ८० टक्के अनुदान मिळेल.
उर्वरीत २० टक्के रक्कम दोन दिवसात भरावी लागेल़ नाही तर ४० टक्के रक्कम भरावी लागेल, असे सांगितले.
त्यानुसार ५ एच पी सोलर कृषी पंपासाठी प्रत्येकी ६४ हजार १९२ रुपये प्रमाणे एकूण २ लाख ५६ हजार ७६८ रुपये
भरावे लागतील, असे सांगितले. त्यांच्याकडून रोख व भावाच्या पे फोनवर पैसे घेतले.
त्यानंतर त्यांनी सोलर पंप कधी बसविणार याची चौकशी केल्यावर त्याने टाळाटाळ केली.
तेव्हा त्यांनी पुण्यात येऊन पौड रोडवरील कंपनीच्या कार्यालयाच्या पत्तावर शोध घेतला असता तेथे कंपनीचे
कार्यालय नसल्याचे आढळून आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी
इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title :- Pune Crime News | Fraud of the trio by luring them to get subsidy for solar pump; FIR against Swapnil Bandgar and Vijay Bandgar in Indapur Police Station