Pune Crime News | ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक, तुळशीबागेतील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सध्या प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन व्यवहार (Online Transactions) केले जातात. याचाच गैरफायदा सायबर चोरटे (Cyber Crime) घेत असल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे लिमिट वाढवून देण्याच्या बहाण्याने तुळशीबागेतील एका महिलेची तीन लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 13 जुलै ते 14 जुलै 2023 दरम्यान महिलेच्या राहत्या घरी ऑनलाईन पद्धतीने घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत निकीता दत्ता राऊत (वय-32 रा. तुळशीबाग, पुणे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 79800XXXXX मोबाईल धारक व एचडीएफसी बँकेच्या खातेधारकावर आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अनोळखी मोबाईल धारकाने संपर्क साधला. आरोपीने ऑनलाईन आर.टी.जी.एस करुन देतो तसेच अकाउंट ट्रान्झॅक्शनचे लिमिट वाढवून देण्याची बतावणी केली. तसेच फिर्यादी यांना Reskdesk नावाचे स्क्रीन शेअर अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी अॅप डाऊनलोड केले. (Pune Crime News)

त्यानंतर आरोपीने त्यांच्या मोबाईलचा पुर्ण ताबा घेऊन फिर्य़ादी यांच्या बँक खात्यातून 2 लाख 98 हजार 996
रुपये एचडीएफसी बँकेच्या खात्यात जमा करुन घेत फसवणूक केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्य़ादी
यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार अर्जाची चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे दादा गायकवाड (PI Dada Gaikwad) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | इंदापूरात मराठा आंदोलकांच्या जलसमाधीने प्रशासनाची धावपळ, एक आंदोलक बुडाला पण सुदैवाने बचावला!

Pune Crime News | पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार करुन खून, येरवड्यातील ब्रह्मा सनसिटी परिसरातील घटना

Priyanka Chopra Glamorous Look | ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्राच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियाचा वाढवला पारा…!

Malaika Arora Bold Look | मलाइका अरोरानं घातला काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केली उर्फी सोबत तुलना..