Pune Crime News | प्रियकराच्या त्रासामुळे तरुणीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल; पिंपरी चिंचवडमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ब्रेकअप झाल्यानंतर प्रिकराकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून एका 21 वर्षाच्या तरुणीने आत्महत्या (Suicide Case) केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. याप्रकरणी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने रविवारी (दि.5) पिंपळे निलख येथे राहत्या घरी आत्महत्या केली. (Pune Crime News)

याबाबत मृत तरुणीच्या 23 वर्षाच्या बहिणीने सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन ऋषभ उर्फ पिन्या अविनाश कांबळे Rishabh alias Pinya Avinash Kamble (रा. सिद्धार्थनगर, औंध) याच्यावर आयपीसी 306, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचे आरोपी पिन्या कांबळे याच्या सोबत प्रेमसंबंध (Love Affair)
होते. मात्र त्यांच्यात वाद झाल्याने मागील एक वर्षापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र, आरोपी कांबळे याने
फिर्यादी यांच्या बहिणीला सतत फोन करुन त्रास देत होता. तसेच तिला भेटून आणि राहत्या घराजवळ येवून लग्न
करण्यासाठी जबरदस्ती करुन वाद घातला. तसेच तिला धमकी दिली. पिन्या कांबळे याच्याकडून होत असलेल्या
त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या बहिणीने रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आत्महत्या केली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावंडे (PSI Gawande) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Accident News | दुर्दैवी ! सांगलीच्या जवानाचा अपघातात मृत्यू

Pune Crime News | बांधकाम व्यवसायिकाची फसवणूक, महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल; पिंपरी चिंचवडमधील प्रकार

Chhagan Bhujbal | भुजबळांचा गंभीर आरोप, कुणबी प्रमाणपत्र घेऊन यायचे आणि ओबीसींना बाहेर ढकलायचे…

Someshwar Foundation Pashan Pune | फराळ खरेदीसाठी नागरिकांचा उत्सुर्त प्रतिसाद ! ‘सनी’ज् फूड्स आणि सोमेश्वर फाउंडेशनचा उपक्रम

Ranjit Taware | अजितदादांचे निकटवर्तीय रणजित तावरे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या संचालकपदी निवड