Pune Crime News | पतीच्या बाहेरख्यालीला विरोध केल्याने विवाहितेचा छळ; महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिघांना अटक

पुणे : Pune Crime News | पतीचे बाहेरील महिलांसोबत असलेल्या प्रेमसंबंधांना (Love Affairs) विरोध केल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या (Suicide In Pune) केली. सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police) आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या पती, सासु, सासरे यांना अटक केली आहे. (Pune Crime News)

भिवराज जगन्नाथ तांबे, जगन्नाथ तांबे आणि शेवंता तांबे (रा. तांबेवस्ती, साखरवाडी, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोमल तांबे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना धनकवडी येथील मोहननगरमधील विघ्नहर्ता अपार्टमेंटमध्ये (Vighnaharta Apartment, Dhankawadi) २६ डिसेबर रोजी घडली होती. (Pune Crime News)

याबाबत दादासो राधु खरात (वय ५२, रा. निंबोडी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी यांची मुलगी कोमल हिचा भिवराज तांबे याच्याशी विवाह झाला होता.
लग्नानंतर त्याचे बाहेरील महिलांसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती कोमलला मिळाली.
तिने हा प्रकार बंद करायला सांगितला. तेव्हा त्याने कोमला तू शांत रहा़ जास्त कालवा केल्यास वाईट परिणाम
भोगावे लागतील, असे म्हणून धमकी दिली. तिचे सासु, सासरे यांनी कोमल हिला सतत घराचे कामावरुन
मानसिक व शारीरीक त्रास देऊन तू पुण्यात राहायचे नाही. आमच्यासोबत गावी रहायचे बोलून तिला त्रास देऊन
जगणे मुश्किल करुन टाकले होते. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक शेंडे
(API Shende) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime News | Harassment of wife for opposing husband’s extra marital affair; Three arrested for inciting woman to commit suicide

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Diabetes Diet | थंडीत वाढू शकते ब्लड शुगर, कंट्रोल करण्यासाठी ‘या’ 5 गोष्टींचा डाएटमध्ये करा समावेश

Fasting Liquid | सणानंतर ‘या’ 5 देशी ड्रिंक्सने शरीर होईल डिटॉक्सिफाई