Pune Crime News | चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीवर चाकूने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न, पतीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीवर चाकूने वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) उपचार करण्यात येत आहेत. (Pune Crime News)

याबाबत विमानतळ पोलिसांनी (Pune Police) अशोक लक्ष्मण आढाव Ashok Laxman Adhaav (वय ३१, रा. राजीव गांधीनगर, विमाननगर) याला अटक (Arrest) केली आहे. याबाबत एका २८ वर्षाच्या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार विमाननगर येथील ईस्ट कोर्ट हॉटेलच्या (East Court Hotel) बाहेर रविवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे पतीपत्नी आहेत.
फिर्यादी या हॉटेल बॅकस्टेज (Backstage Hotel) येथे गेल्या होत्या. त्यावेळी अशोक आढाव हॉटेलमध्ये आला.
त्याने फिर्यादी यांना तुझे दुसर्‍या मुलाबरोबर संबंध असल्याचा संशय घेऊन शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.
त्यानंतर फिर्यादी या हॉटेलबाहेर येऊन थांबल्या होत्या. तेव्हा आढाव याने फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण
(Beating) करुन तुला सोडत नाही, खल्लास करतो, असे म्हणून त्याच्याकडील धारदार चाकूने फिर्यादीवर सपासप वार केले.
फिर्यादी यांना पाच ते सहा ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी अशोक आढाव याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक देशमुख (API Deshmukh) तपास
करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पैशांचा पाऊस पाडतो सांगून 18 लाखांची बॅग केली लंपास, हडपसर परिसरातील प्रकार

यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार

आमची जमीन रस्त्यात गेली, महिलेने भाजी विक्रेत्याकडून उकळली खंडणी; हिंजवडी परिसरातील प्रकार

यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्याच्या बदल्यात आधी दिले पैसे, नंतर साडेपाच लाखांना घातला गंडा; कोंढवा परिसरातील प्रकार