Pune Crime News | गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून तारांकित हॉटेलमधील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी तरूणीसह दोघींची सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कल्याणीनगर येथील तारांकित हॉटेलमध्ये परदेशी तरुणींकडून (Foreign Girl) वेश्या व्यवसाय (Prostitute Racket) करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) सामाजिक सुरक्षा विभागाने (Pune Social Security Department) हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी करण ऊर्फ रामू किशोर यादव Karan alias Ramu Kishore Yadav (वय ३५, रा. स्काय लाईट सोसायटी, वाघोली) याला अटक केली आहे.

याबाबत सामाजिक सुरक्षा विभागातील (SS Cell Pune) महिला अंमलदारांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५६६/२३) दिली आहे. हा प्रकार कल्याणीनगर येथील रॉयल ऑर्चिड गोल्डन सुट या हॉटेलमध्ये (Royal Orchid Golden Suites Hotel Kalyani Nagar) सुरु असल्याची माहिती पोलिस अंमलदार सागर केकाण (Police Sagar Kekan) आणि तुषार भिवरकर (Police Tushar Bhivarkar) यांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी रॉयल ऑर्चिड गोल्डन सुट या हॉटेलवर छापा टाकून एका उझबेकिस्तानी तरुणीला पकडले. तेथेच करण यादव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर रॉयल ऑर्चिड सेंटल या हॉटेलमध्येही एका उत्तर प्रदेशातील तरुणीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे समजले. तेथून एका तरुणीला ताब्यात घेतले. वेश्या व्यवसायातून मिळालेले २५ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले असून दोघा तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे (DCP Amol Zende) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव
(Sr PI Bharat Jadhav), सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे (API Aniket Pote), एपीआय राजेश माळेगावे
(API Rajesh Malegave), एपीआय अश्विनी पाटील (API Ashwini Patil), पोलिस हवालदार अजय राणे, राजेंद्र कुमावत,
बाबा कर्पे, पोलिस अंमलदार सागर केकाण, तुषार भिवरकर, अमेय रसाळ, अमित जमदाडे, संदीप कोळगे, किशार भुजबळ,
ओंकार कुंभार, इरफान पठाण आणि महिला पोलिस रेश्मा कंक यांच्या पथकाने केली आहे.
पोलीस निरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI UDGAM Portal | बॅंकेमध्ये दावा न केलेली रक्कम आता एकाच वेबसाईटवर पाहता येणार; आरबीआयने केले खास पोर्टल लॉन्च

Pune Crime News | अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या 4 जणांना गुन्हे शाखेकडून अटक; 46 लाखांचे एम.डी., कोकेन, चरस जप्त (Video)