Pune Crime News | मला तुझ्यासोबत इथेच शारीरिक संबंध… ! प्रवाशाकडून नग्नावस्थेत रिक्षा चालक महिलेचा पाठलाग, कात्रज घाटातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | रिक्षा चालक महिलेचा (Lady Auto Driver) विनयभंग केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) एकाविरूध्द गुन्हा (Molestation Case) दाखल करण्यात आला आहे. ही घटना कात्रज घाटात (Katraj Ghat) एका ठिकाणी असलेल्या लॉजिंग बोर्डाजवळ सोमवारी (दि.26) रोजी रात्री 10 वाजता घडली आहे. (Pune Crime News)

निखील अशोक मेमजादे Nikhil Ashok Memjade (रा. शंकरमठ, हडपसर, पुणे) असे प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी 38 वर्षीय रिक्षा चालक महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे (Crime Against Woman). याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी निखील मेमजादे हा मगरपट्टा (Magarpatta Hadapsar) येथुन फिर्यादीच्या रिक्षात प्रवासी म्हणून बसला. रिक्षा कात्रज घाटात आल्यानंतर त्याने रिक्षा थांबविण्यास सांगितली. खाली उतरल्यानंतर सर्वप्रथम मेमजादेने फिर्यादीस जेवणासाठी बळजबरी केली. त्यास त्यांनी नकार दिला असता त्याने त्यांच्या गालात चापट मारली. (Pune Crime News)

मला तुझ्या सोबत इथेच शारीरीक संबंध करायचे आहेत, या अंधारात तुझ्या मदतीला कोणीही येणार नाही, तुला काय करायचे ते कर असे म्हणून मेमजादेने अंगावरील सर्व कपडे काढले आणि तो स्वतः नग्न झाला (Nude Pose) आणि फिर्यादी रिक्षा चालक महिलेच्या बाजुला बसला. त्यामुळे फिर्यादी या रिक्षातुन खाली उतरून पळु लागल्या तरी आरोपीने त्यांचा नग्नावस्थेत पाठलाग केला. प्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक घोगरे करीत आहेत. (Molestation Of Lady Auto Driver)

Web Title :– Pune Crime News | I want physical relations with you right here… ! Woman rickshaw driver chased naked by passenger, Katraj Ghat incident

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | सोनं खेरेदीने नवीन वर्षाचे स्वागत करण्याची सुवर्णसंधी, सोने-चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा दर

Madhurani Gokhale Prabhulkar | मॉडर्न कपड्यांवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युजरला अरुंधतीने दिले ‘हे’ सडेतोड उत्तर

Madhura Deshpande | तब्बल 3 वर्षांनी अभिनेत्री मधुरा देशपांडे दिसणार ‘या’ मालिकेत; साकारणार ‘हि’ महत्त्वाची भूमिका