Pune Crime News | अख्खे एनडीए उडवून टाकेन; धमकी देणार्‍यास उत्तमनगर पोलिसांनी केले अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वडिलांनी आणि सासर्‍याने मानसिक त्रास दिल्याने त्यांना अडकविण्यासाठी एकाने खडकवासला येथील अख्खे एनडीए (NDA Khadakwasla) उडवून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

अमोल महादेव वाघ Amol Mahadev Wagh (वय ३३, रा. इंदिरा वसाहत, उत्तमनगर) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नियंत्रण कक्षातील ११२ (Pune Police Control Room) वर गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक कॉल आला. त्यात त्या व्यक्तीने पुणे व अहमदनगर येथे प्रत्येकी तीन ठिकाणी ब्लास्ट करण्यात येणार आहे. त्यांच्याजवळ मशीनगन आणि आरडीएक्स असल्याची माहिती दिली. त्यातील दोघे एनडीएमध्ये ब्लास्ट करणार आहेत, असे सांगून त्यांचे नंबरही देण्यात आले. ही माहिती समजल्यावर पुणे शहर पोलिस दलाबरोबर (Pune City Police Force) उत्तमनगर पोलिसांना (Uttam Nagar Police Station) अलर्ट करण्यात आले. पोलिसांनी तातडीने एनडीए गाठले. तेथील लेफ्टनंट कर्नल थापा, कर्नल पांडे आणि मेजर ठोंबरे यांनी याची माहिती दिली. त्यांनी तातडीने एनडीएची संरक्षण यंत्रणा सर्तक केली.

दरम्यान, हा कॉल कोणी केला याची माहिती घेतली जात होती. त्यात हा कॉल अमोल वाघ याने केल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन पकडले. (Pune Crime News)

त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने दारुच्या नशेत हा कॉल केल्याचे आढळून आले.
अमोल वाघ हा बिगारी काम तसेच डायव्हर म्हणून मिळेल ते काम करतो.
त्याच्या वडिलांनी जमीन विकल्यानंतरही त्याला काहीही दिले नाही.
वडिलांनी आणि सासर्‍याने मानसिक त्रास दिल्याने त्याच्या रागातून त्यांना अडकविण्यासाठी त्याने कॉल केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | दालचाचे पैसे मागितल्याने डोक्यात सळई घालून केले जखमी; गुंडाला पोलिसांनी केले जेरबंद

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर