Pune Crime News | ऑनलाइन अ‍ॅपवर झालेली ओळख महागात; महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण करुन अनैसर्गिक कृत्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | ऑनलाइन अ‍ॅपवरुन (Online App) झालेली ओळख महाविद्यालयीन तरुणाला महागात पडली. तरुणाला आमिष दाखवून त्याचे ससून रुग्णालय (Sassoon Hospital) परिसरातून अपहरण (Kidnapping Case) करण्यात आले. भोसरी परिसरात तरुणाला शस्त्राचा धाक दाखवून त्याच्याशी तिघांनी अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर आरोपींनी तरुणाला धमकावून त्याच्याकडील २८ हजार ५०० रुपयांची रोकड लुटल्याची घटना घडली.

याबाबत एका २१ वर्षाच्या तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३०७/२३) दिली आहे. हा प्रकार १ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण तळेगाव दाभाडे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात (Engineering College) शिक्षण घेत आहे. एका अ‍ॅपवरुन तरुणाची आरोपींशी ओळख झाली होती. आरोपींनी त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्याला पुणे स्टेशन परिसरात भेटण्यास बोलावले. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ तरुणाला मोटारीत बसण्यास सांगितले. फिरायला जाऊ असे सांगून आरोपींनी त्याला मोटारीतून भोसरी एमआयडीसी (Bhosari MIDC) परिसरात नेले.

भोसरी एमआयडीसी परिसरात निर्जन जागी आरोपींनी त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले.
तरुणाला धमकावून ऑनलाइन पद्धतीने त्याच्या खात्यातील २८ हजार ५०० रुपये काढून घेतले.
त्यानंतर तरुणाला सोडून तिघे जण मोटारीतून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक जाधव (PSI Jadhav) तपास करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुर्ववैमनस्यातून नाना पेठेत भरदिवसा दोघांवर खुनी हल्ला; एकाची प्रकृती चिंताजनक, प्रचंड खळबळ

Pune Crime News | ससून हॉस्पीटलच्या वॉर्ड नं. 16 मधून आरोपीचे पलायन, प्रचंड खळबळ

03 October Rashifal : मिथुन, वृश्चिक आणि मकर राशीच्या जातकांना होणार धनलाभ, वाचा दैनिक भविष्य