Pune Crime News | येरवडयातील यशवंत नगरमध्ये पती-पत्नीस बेदम मारहाण, चौघांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | येरवडयातील यशवंत नगरमधील (Yashwant Nagar Yerwada) तलेसरा हॉस्पीटलजवळ (Talesara Hospital, Orthopedics Clinic in Yerwada) राहणार्‍या पती-पत्नीस चौघांनी बेदम मारहाण केली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली असून याप्ररकणी चौघांविरूध्द येरवडा पोलिस स्टेशनमध्ये (Yerwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

गौरव शंकर शेलार (Gaurav Shankar Shelar) , ऋषी शेलार, कार्तिक शेलार आणि मनोज शिंदे (सर्व रा. यशवंत नगर, येरवडा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला आणि आरोपी हे एकाच परिसरात रहावयास आहेत.
आरोपींनी फिर्यादीच्या शेजारी राहणार्‍या महिलेच्या घराच्या बाहेरील पाण्याचा टफ व सायकल पाडली होती.
त्याचा जाब त्या महिलेने त्यांना विचारला असता आरोपींनी त्यांना आणि तिच्या पतीस मारहाण केली.
दरम्यान, आरोपींनी फिर्यादी महिलेच्या घराबाहेरील पाण्याचे भांडे व मोटारसायकल पाडली. त्याचा जाब फिर्यादीच्या पतीने आरोपींना विचारला.

त्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या पतीच्याडाव्या पायावर मारून त्यांच्या करंगळीचे हाड फ्रॅक्चर केले.
फिर्यादी महिला या भांडणे सोडविण्यासाठी गेल्या असता आरोपी गौरव शंकर शेलार याने त्यांच्या डोक्यात दगड
मारून त्यांना जखमी केले. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुरव (PSI Gurav) करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | In Yashwant Nagar of Yerawada, husband and wife were brutally beaten, a case against four

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Financial Literacy and Cyber ​​Security | आर्थिक साक्षरता, सायबर संरक्षणबाबत राज्य शासनाचा त्रिपक्षीय करार

Mumbai Pune Expressway Accident News | मुंबई-पुणे एक्सप्रेसवर केमिकल टँकरचा भडका ! होरपळून 3 ठार तर तिघे जखमी; दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प

Pune Crime News | शुक्रवार पेठेत वकिलाला लाकडी बांबुने मारहाण

NCP MP Supriya Sule On Farmer Protest | शेतकरी आंदोलनादरम्यान ट्विटरवर दबाव आणि धमकी प्रकरणाची चौकशी करावी; खासदार सुप्रिया सुळे यांची पंतप्रधान कार्यालयाकडे मागणी