Pune Crime News | ‘आयुष’च्या प्रवेश परीक्षेच्या क्लासच्या नावाखाली महिलेशी अश्लिल वर्तन; शिक्षकावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अखिल भारतीय आयुषच्या (Akhil Bhartiya Ayush) पदवीत्तर प्रवेश परीक्षेचे क्लास घेण्याच्या नावाखाली शिक्षकाने महिलेला योनक्रिया, कामसुत्र अशा वेगवेगळ्या गोष्टीविषयी बोलून त्यांच्याशी अश्लिल वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत सदाशिव पेठेत राहणार्‍या एका २६ वर्षाच्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २२१/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रविराज मोरे Raviraj More (वय ५०, रा. मथुरा कॉम्प्लेक्स, राष्ट्रभूषण चौक, घोरपडी पेठ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार करिअर डेव्हलपमोट अकॅडमी (Career Development Academy) येथे १८ एप्रिल ते २० एप्रिल २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आरोपी रविराज मोरे हा भारतीय आयुष संस्थेच्या पदवीत्तर प्रवेश परीक्षांचे क्लास घेतो, असे खोटे सांगितले. फिर्यादी यांनी २१ हजार रुपये भरुन त्यांच्या क्लासला प्रवेश घेतला. त्या क्लासला गेल्यावर त्यांना योन क्रिया व पुसवन विधीबद्दल माहिती आहे का तसेच फिर्यादी यांना कामसुत्रबद्दल काहीतरी सांगा, असे म्हणाला. जर माहिती असेल तर अजंठा वेरुळ लेण्यात (Ajanta Verul Caves) योन क्रियाच्या अनेक पोझेस आहेत तुम्ही पाहिल्या का, असे बोलून त्यांच्या शरीराचे अश्लिल पद्धतीने वर्णन केले. त्यामुळे त्यांनी क्लास करण्यास नकार देऊन २१ हजार रुपये परत मागितले. तेव्हा त्याने पैसे परत करण्यास नकार देऊन शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी आईशी चर्चा केली. आईने धीर दिल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलीस हवालदार पारखे तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | Indecent behavior with a woman in the name of ‘AYUSH’ entrance examination class; A case was filed against the teacher

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | सोन्याचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा पुण्यातील भाव

Today Horoscope | 5 July Rashifal : मेष, कर्क आणि मीन राशीसाठी दिवस यश देणारा, वाचा १२ राशींचे दैनिक राशीभविष्य

Petrol-Diesel Price Today | पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

Amol Mitkari | “शरद पवार आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही”; अमोल मिटकरींनी आव्हाडांना खडसावले

Monsoon Update | अनेक राज्यात 8 जुलैपर्यंत मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज