Pune Crime News | पुण्यातील कणसे अँड कंपनीची साडेबारा लाखांची फसवणूक, तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शॉपमध्ये विक्रीसाठी ठेवलेले वॉटर पंप चोरून 12 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कणसे अँड कंपनी वॉटर पंप अँड सेल्स सर्व्हिस लि. (Kanse & Company Water Pump & Sales Service Ltd.) मांजरी बु. येथे 2022 ते 12 नोव्हेंबर दरम्यान घडला आहे. याप्रकरणी तिघांवर हडपसर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

याबाबत मयुर अनिल कणसे (वय-32 रा. कनसे हाईट्स, मांजरी बु. ता. हवेली) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन गणेश उत्तम नलावडे, दत्तात्रय अर्जुन मुंढे, कालीदास सोपान बंडे यांच्यावर आयपीसी 381, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या कणसे अँड कंपनी वॉटर पंप अँड सेल्स सर्व्हिस लि.कंपनीचे मांजरी बु.
येथे शॉप आहे. या शॉपमध्ये ग्राहकांना विक्री करण्यासाठी वॉटर पंप ठेवले आहेत.
आरोपींनी संगनमत करुन शॉपमधील 12 लाख 60 हजार रुपये किंमतीचे वॉटर पंप चोरुन नेले.
तर आरोपी गणेश नलावडे याने फिर्यादी यांच्याकडील कस्टमरचा डेटा घेऊन
कस्टमरला स्वत:कडे वळवून घेत फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दाभाडे (API Dabhade) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

धक्कादायक! गर्लफ्रेंडशी भांडण झाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलनं संपवलं स्वत:चं आयुष्य

नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली, संदीप कर्णिक नाशिकचे नवे पोलिस आयुक्त