Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने वार, घोरपडी गावातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | जुन्या भांडणाचा राग मनात धरुन चार जणांच्या टोळक्याने एका तरुणावर धारदार चाकूने वार करुन जखमी केले. हा प्रकार रेल्वे पटरी शेजारी विकासनगर घोरपडीगांव येथे 11 नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

जेम्स लुईस अॅन्थोनी (वय-24 रा. विकासनगर, घोरपडीगांव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन मॉन्टो मायकल जोसेफ Monto Michael Joseph (वय-22), मंजु मायकल जोसेफ Manju Michael Joseph (वय-45), वेल्ला साबळे (वय-50), शितल रोहीदास चुवे Sheetal Rohidas Chuve (वय-35) यांच्यावर आयपीसी 323, 324, 504, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेम्स अॅन्थोनी हा त्याचा मित्र मायकल याच्यासोबत दुर्गामाता मंदिराजवळ गप्पा मारत बसला होता. त्यावेळी आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन जेम्स याच्यावर चाकूने वार केले. तसेच लोखंडी पाईप, हाताने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिवडे (PSI Biwade) करीत आहेत. (Pune Crime News)

डोळ्यात पावडर टाकून वार

खरेदी करण्यासाठी जात असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात पावडर टाकून धारदार हत्याराने वार केले.
ही घटना घोरपडी गावातील जामा मस्जिद समोरील गल्लीत शुक्रवारी (दि.17) सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे.
याबाबत सेल्वीना जॉर्ज डिसील्वा (वय-32 रा. कासेवाडी पोलीस चौकीच्या समोर, भवानी पेठ, पुणे) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींवर आयपीसी 324, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रासकर (API Raskar) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ का टाकला?, तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण; उरुळी देवाची येथील घटना