Pune Crime News | इन्स्टाग्रामवर व्हिडिओ का टाकला?, तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण; उरुळी देवाची येथील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | तू इन्स्टाग्रामवर (Instagram) व्हिडिओ का टाकला? अशी विचारणा करत एका तरुणाला 10 ते 12 जणांच्या टोळक्याने मारहाण (Beating) करुन दमदाटी केल्याचा प्रकार उरुळी देवाची येथे घडला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.18) वाल्हेकर वस्ती बस स्टॉप जवळ असलेल्या न्यु लुक हेअर सलुन येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत रईस एहमद अख्तर हुसेन खान (वय-32 रा. वाल्हेकर वस्ती, उरुळी देवाची, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी सोनु जगताप (रा. वाल्हेकर वस्ती, उरुळी देवाची) याच्यासह 21 ते 22 वयोगटातील 10 ते 12 जणांवर 143, 147, 149, 323, 427, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी रईस खान यांचे वाल्हेकर वस्ती बस स्टॉप येथे सलुनचे दुकान आहे. शनिवारी दुपारी ते दुकानात काम करत असताना त्यांच्या ओळखीचा आरोपी सोनु जगताप हा त्याच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला.
त्याने खान यांच्या दुकानाचा बोर्ड फाडून नुकसान केले. तसेच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील एक व्हिडिओ खान याला दाखवला.
हा व्हिडिओ तू इन्स्टाग्रामवर का टाकला? अशी विचारणा करुन आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली.
तसेच हाताने बेदम मारहाण करुन दमदाटी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

सार्वजनिक रोडवर अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, हडपसरमधील प्रकार; दोघांना अटक

तीन वर्षाच्या मुलीसोबत अश्लील चाळे, वडगाव शेरी मधील धक्कादायक घटना