Pune Crime News | कोंढाव्यातील व्यापाऱ्यांच्या फसवणूक प्रकरण : बिल्डर रत्नाकर पवार व अशोक अहिरे यांचा जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | भागीदारीत एकत्रित व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या प्रकल्पाच्या नावाने पैसे घेऊन ते पैसे प्रकल्पात न गुंतविता फसवणुक केल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक व भाजप नेते रत्नाकर पवार व रिअल इस्टेट व्यावसायिक अशोक अहिरे यांचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कॅन्टोन्मेंट कोर्ट, पुणे न्यायाधीश सी.एन. ओंडारे यांनी फेटाळून लावला आहे. (Pune Crime News)

या प्रकरणी मोहद्दीस महंमद फारुख बखला (रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. बखला यांची स्वत:ची टुर्स अँड ट्रव्हल्सची व ड्रीम होम कन्स्ट्रक्शन कंपनी आहे़ दस्तागीर पटेल हे भागीदार असून त्यांना फेब्रुवारी २०१७ मध्ये अनिस मेमन यांनी इतर आरोपींशी ओळख करुन दिली. नाशिक येथील रत्नाकर पवार यांच्या मालकीच्या गिरणा इंफ्रा प्रोजेक्ट व इतर ठिकाणी पैसे गुंतविल्यास भरपूर फायदा मिळेल असे सांगितले. त्यांच्याबरोबर करार करुन त्यांची आरोपींनी आकर्षक मोबदल्याचा बहाणा करुन १ कोटी ६४ लाख १६ हजार ३८७ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. कोंढवा पोलिसांनी रत्नाकर पवार आणि अशोक अहिरे यांना अटक केली होती. (Pune Crime News)

आरोपी रत्नाकर पवार आणि अशोक हिरे यांनी कॅन्टोन्मेंट कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता.
या अर्जावर मंगळवारी (दि.17) सुनावणी झाली. सुनावणी वेळी फिर्यादी यांचे
वकील अॅड. महेश झंवर यांनी जामीन अर्जाला विरोध केला.
त्यानंतर न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच आरोपींची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lalit Patil Drugs Case | पुणे पोलिसांनी अटक केलेल्या ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना 4 दिवसांची पोलीस कोठडी (Video)

Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात ओढून उकळली 8 लाखांची खंडणी, पुण्यातील पती-पत्नीसह तिघांवर FIR

जेसीबी मशीन विकण्याच्या बहाण्याने तरुणाची फसवणूक, रत्नागिरीमधील आरोपीवर पुण्यात FIR