Pune Crime News | कोंढवा पोलीस : शाळेच्या मालमत्तेच्या वादात शिक्षिकेचा विनयभंग करणार्‍या तिघांवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | शाळेच्या मालमत्तेवरुन दोघा प्रिन्सिपल व त्यांच्या भावांमध्ये वाद सुरु आहे. त्यात भावाने शिक्षिकेला शाळेत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत त्यांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत एका ३६ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७१०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जुबेर रशिद खान Zubair Rashid Khan (वय ४५, रा. पदमजी पार्क, नाना पेठ), अजहर खान Azhar Khan (वय ३८) आणि अफाक अन्सार खान Afaq Ansar Khan (वय ४०) यांच्यावर गुन्हा दखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील मिठानगर (Mitha Nagar Kondhwa) येथील प्राथमिक शाळेत ५ जुलै २०२३ रोजी सकाळी साडेदहा वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कोंढव्यातील मिठानगर येथील एका प्राथमिक शाळेत टिचर म्हणून काम करतात. शाळेच्या प्रिन्सिपल आणि त्यांचा भाऊ जुबेर यांच्यात शाळेच्या मालमत्तेवरुन वाद चालू आहेत. फिर्यादी या नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत जात असताना गेटवरच जुबेर याने फिर्यादी यांचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. शाळेत न जाण्याची धमकी दिली. तसेच इतरांनी फिर्यादीस शाळेत जायचे नाही नाही तर आम्ही तुला मारणार अशी धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक तोरगल (API Torgal) तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Kondhwa Police Registered FIR On Three In Molestation Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा