Pune Crime News | हॉटेल कर्मचाऱ्यांकडून मालकाला लाखोंचा गंडा, मगरपट्टा परिसरातील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | ग्राहकांनी ऑनलाईन जमा केलेले पैसे रेस्टॉरंटच्या बँक खात्यावर न घेता स्वत:च्या बँक खात्यात जमा करुन घेत रेस्टॉरंट मालकाची 6 ते 7 लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2023 ते रविवारी (दि. 19 नोव्हेंबर) दरम्यान मगरपट्टा परिसरातील मनभुवन प्रिमीयम थाळी (Manbhuvan Premium Thali) येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत राहुल जगदीश चांडक (वय-52 रा. सिमरन बंगलो, तिडके कॉलनी, कसबेवाडी, नाशिक) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन हॉटेलमध्ये काम करणारे अंकित लक्ष्मीशंकर त्रिवेदी Ankit Laxmishankar Trivedi (वय-31), तुषार घनश्याम इंदापुरे (वय-31), उदयभान सिंग (वय-30) यांच्यावर आयपीसी 408, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचे मगरपट्टा परिसरातील सिझन मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर मनभुवन प्रिमीयम थाळी नावाचे रेस्टॉरंट आहे. तर आरोपी हे या ठिकाणी कामाला आहेत. आरोपींनी संगनमत करुन फेब्रुवारी 2023 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत रेस्टोरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून स्वत:च्या बँक खात्यावर ऑनलाईन पैसे जमा करुन घेतले.
आरोपींनी फिर्य़ादी यांचा विश्वासघात करुन सहा ते सात लाख रुपयांचा अपहार करुन पळून गेले आहेत.
याबाबत चांडक यांनी हडपसर पोलिसात तक्रार अर्ज केला होता.
या तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी सोमवारी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

धक्कादायक! गर्लफ्रेंडशी भांडण झाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलनं संपवलं स्वत:चं आयुष्य

नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली, संदीप कर्णिक नाशिकचे नवे पोलिस आयुक्त