Pune Crime News | पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | कुंजीरवाडी येथील पेट्रोल पंपावर दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या टोळीला लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील (Loni Kalbhor Police Station) तपास पथकाने अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन लोखंडी पालघन, दरोड्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई (Pune Crime News) सोमवारी (दि.23) मध्यरात्री म्हातोबाची आळंदी रेल्वे ब्रिजजवळ करण्यात आली.

 

प्रेम राजु लोंढे (वय-19 रा. रेल्वे गेट जवळ, आळंदी रोड, मुळ रा. जामखेड, अहमदनगर), ऋषिकेश उत्तम लोंढे (वय-26 रा. पानमळा राड, मुळ रा. बाबळगाव, जि. बीड), गणेश भगवान खलसे (वय-22 रा. माळवाडी कुंजीरवाडी, ता. हवेली), तानाजी भाऊसाहेब गावडे (वय-23 रा. माळवाडी, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तर त्यांचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

 

लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.23) रात्री फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार आडके व भगत यांना माहिती मिळाली की, 7 ते 8 जण म्हातोबाची आळंदी रेल्वे ब्रिजच्या जवळ थांबले असून ते येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडवत आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना पाहून पळून जात असताना चार आरोपींना पकडण्यात आले. तर त्यांचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता कुंजीरवाडी येथील अ‍ॅटोकॉर्नर एच.पी. पेट्रोल पंपावर (Ato Corner H.P. Petrol Pump) दरोडा टाकण्यासाठी जात असल्याची कबुली दिली. आरोपींकडून 2 लोखंडी पालघन, मिरची पुड, बॅटरी, नायलॉन दोरी, एक घट्ट चिकटपट्टी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ -5 विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण (Senior Police Inspector Dattatray Chavan),
पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale)
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे (PSI Amit Gore),
वैभव मोरे (PSI Vaibhav More) पोलीस अंमलदार नितीन गायकवाड, आनंद पाटोळे, सुनिल नागलोत,
श्रीनाथ जाधव, नितेश पुंडे, शैलेश कुदळे, निखील पवार, दिपक सोनवणे, बाजीराव वीर, भगत, आडके, विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime News | Loni Kalbhor police arrested a gang that was preparing to rob a petrol pump

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | एकाच कुटुंबातील 7 जणांच्या आत्महत्येचे गुढ उकलले, मुलाने मुलीला पळवून नेलं अन्…, पुणे जिल्ह्यात खळबळ

Jayant Patil | देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर जयंत पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘लोक फार हुशार आहेत, 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना…’

Devendra Fadnavis | या दिवशी होणार राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली तारिख