Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – अपघातामुळे बनावट नंबर प्लेट लावून फिरणारा कारचालक सापडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | आपल्या वाहनांवर कारवाई होऊ नये, म्हणून अनेक जण नंबरप्लेटमध्ये आकड्यांची आदलाबदल करुन वाहने दामटत असतात. असे एक महाशय असेच बनावट नंबर प्लेट (Fake Number Plate) लावून कार फिरवत होते. त्या कारला अपघात होऊन त्यात एका तरुणाचा मृत्यु झाला. त्यातून त्याचा हा प्रताप उघड झाला. (Pune Crime News)

लोणी काळभोर पोलिसांनी आदिल सिराज मुलाणी Adil Siraj Mulani (वय २३, रा. दिवे, ता. पुरंदर) या कारचालकाला अटक केली आहे. या अपघातात श्रीधर धर्मा कदम Shridhar Dharma Kadam (वय ३३, रा. लोणी गाव) यांचा मृत्यु झाला होता. हा अपघात वडकी रोडवरील (Wadki Road Pune) दिवांग पार्क फाटा येथे ४ जून रोजी दुपारी ४ वाजता घडला.

याबाबत पोलीस शिपाई अमोल मुंढे (Police constable Amol Mundhe) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३६०/२३) दिली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदिल मुलाणी हा कारचा रजिस्टर नंबर न लावता जाणीवपूर्वक
चुकीचा नंबर टाकून ती कार फिरवत होता. फुरसुंगी येथील वडकी रोडवरील दिवांग पार्क फाटा येथे श्रीधर कदम
हे रिक्षातून खाली उतरले. त्यावेळी पाठीमागून आदिल मुलाणी हा भरधाव कार घेऊन आला.
त्याने कदम यांना धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यात त्यांचा मृत्यु झाला.
पोलिसांनी अपघाताची चौकशी केली़ तेव्हा आदिल हा बनावट नंबर प्लेट लावून कार चालवत असल्याचे आढळून आले.
पोलीस उपनिरीक्षक तरटे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Loni Kalbhor Police Station – A car driver with a fake number plate was found due to an accident

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News |   कोर्टाच्या आदेशानुसार जन्माची नोंद करण्यासाठी 1400 रुपये लाच घेताना ग्रामसेवक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले; जाणून घ्या आजचा भाव

SSC-HSC Supplementary Exam-2023 | 10 वी-12 वीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार