Pune Crime News | लोणीकाळभोर : बदनामी करण्याची धमकी देऊन रिल्सस्टार करुन उकळली खंडणी; चोरीचे सोने घेऊन बनला गोल्डन बॉय, सोशल मिडियावर केली बदनामी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | इन्स्ट्राग्रामवर रिल्स स्टार (Instagram Reels Star) असलेल्या तरुणाला तू चोरीचे सोने घेऊन गोल्डन स्टार बनला असल्याची बदनामी करण्याची धमकी देऊन ३ लाख रुपयांची खंडणी (Extortion Case) मागितली. त्यातील २ लाख रुपये खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी ऊरुळी कांचन येथील ३० वर्षाच्या तरुणाने लोणीकाळभोर पोलिसांकडे (Lonikalbhor Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५४९/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महेश ऊर्फ मल्लाप्पा साहेबान्ना होसमानी Mahesh alias Mallappa Sahebanna Hosmani (रा. शिंदवणे, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ जानेवारी पासून आतापर्यंत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या इन्स्टाग्रामवर रिल्स व्हिडिओ बनवितो. त्याचे साडेचार लाख फॉलोवर्स आहेत. एका मित्राने आरोपी महेश याची ओळख करुन दिली. महेश याने फिर्यादी यांना सासुरवाडीला कार्यक्रम आहे, त्यासाठी एका दिवसासाठी सोन्याची चैन देण्याची विनंती केली. त्यानुसार फिर्यादी यांनी त्याला १८ तोळे वजनाची सोन्याची चैन दिली. काही दिवसांनी त्यांनी चैन परत मागितल्यावर ती गहाण ठेवली असून सोडविण्यासाठी २० हजार रुपये देण्याची मागणी केली. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी त्याला २० हजार रुपये दिले. तरीही चैन परत न केल्याने फिर्यादी यांनी ही बाब भावाला सांगितली. त्यांच्या भावाने माहिती काढल्यावर महेश होसमानी हा गुन्हेगार (Criminal) असून त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल आहे. त्याच्याकडून पोलिसांनी खूप सोने हस्तगत केले आहे, असे समजले. त्यानंतर फिर्यादी यांनी शिंदवणे येथे जाऊन त्याची भेट देतील तेव्हा त्याने उलट फिर्यादी यांना धमकावले. मी तुला चोरीचे सोने दिले असे सांगून तुला गुन्ह्यामध्ये गुंतवेल, अशी धमकी देऊ लागला. (Pune Crime News)

तू लई मोठा रिल्स स्टार आहेस ना, आता बघ मी कशी तुझी सगळी हवा काढतो, तु मला आताच्या आता ३ लाख रुपये दे,
नाही तर मी तुझी सोशल मिडियावर बदनामी करेल आणि मी चोरी केलेले सोने तुला देतो, असे सोशल मिडियावर सांगेल.
मग तुझ्या फॉलोवर्सला कळेल तू कसा गोल्डन बॉय झाला आहेस ते, असे बोलून धमकावू लागला.
त्यानंतर त्याने २४ ऑगस्ट रोजी फिर्यादी हा ऊरुळी कांचनचा गोल्डन बॉय आहे, याचेकडे माझे लाखो रुपये आहेत.
मोनु तू माझे पैसे बुडवु नको, असा बदनामीकारक व्हिडिओ बनवून तो सोशल मिडियावर पोस्ट केला.
ही बाब फिर्यादींना समजल्यावर त्यांनी महेश याला फोन केला.
तेव्हा त्याने बदनामी करुन गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी दिली.
त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरुन त्याला २ लाख रुपये दिले.
त्यानंतर महेश हा वारंवार बदनामीकारक व्हिडिओ पोस्ट करुन फिर्यादी यांची बदनामी करत आहे आणि त्यांच्याकडे
पैशांची मागणी करीत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार केली.
पोलीस उपनिरीक्षक देशमुख (PSI Deshmukh) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याच्या मुलाच्या खूनातील आरोपीच्या जामीनासाठी बनावट कागदपत्रे; न्यायालयाची फसवणूक

Bachchu Kadu | रवी राणांच्या माघारीनंतर बच्चू कडूंचे कार्यकर्ते फार्मात, लावले ‘मै झुकेगा नही’चे बॅनर्स

Siddharth Chandekar | अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनं ‘माझे स्वेटशर्ट्स चोरू नकोस’ अशी वॉर्निंग देत केली पोस्ट शेअर