Pune Crime News | पुणे महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष, लग्नाचे आश्वासन देऊन ‘डर्टी पिक्चर’, कोथरूड पो.स्टे.मध्ये बलात्काराचा FIR

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल साडे आठ लाख रुपये घेतले. तसेच लग्नाचे आश्वासन देऊन शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवून फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

ADV

याप्रकरणी बावधन येथील एका ३४ वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३१७/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संतोष दत्तात्रय पवार Santosh Dattatraya Pawar (रा. मेढा, ता. जावळी, जि. सातारा) याच्यावर बलात्काराचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार कोथरुड, डेक्कन पॅव्हेलियन हॉटेल (Deccan Pavilion Hotel, Kothrud) व नवले ब्रीज परिसरात २०१९ ते फ्रेबुवारी २०२१ दरम्यान घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष पवार याने फिर्यादीचा विश्वास संपादन करुन त्यांना पुणे महापालिकेत नोकरी लावतो, असे आमिष दाखविले. नोकरी लावण्यासाठी त्यांच्याकडून ८ लाख ६८ हजार रुपये घेतले.
या दरम्यान, त्यांच्या घरी झालेल्या वादाचा गैरफायदा घेऊन त्यांच्याशी गोड बोलून लग्नाचे आश्वासन दिले.
त्यांना डेक्कन पॅव्हेलियन हॉटेल येथे बोलावले.
जेवणातून काहीतरी खाण्यास देऊन त्यांच्याशी शारीरीक संबंध केले.
त्यांना नोकरी न लावता तसेच लग्न न करता शारीरीक व मानसिक पिळवणूक करुन
८ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली.
सहायक पोलीस निरीक्षक तांदळे तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Lure of getting a job in Pune Municipal Corporation, ‘dirty picture’ by promising marriage, FIR of rape in Kothrud P.St.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा