Nysa Devgan | काजोल-अजयच्या लेकीचा बोल्ड अंदाज, दुबईतील सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलची लेक न्यासा (Nysa Devgan) ही सध्या खूपच चर्चेत आहे. न्यासाचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता. त्यामध्ये ती पडता पडता वाचली होती. या व्हिडिओवरून नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल देखील केले होते. आता पुन्हा एकदा न्यासाचा (Nysa Devgan) एक व्हिडिओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडिओ एका पार्टीदरम्यानचा असल्याचे दिसत आहे.

 

सध्या अनेक कलाकार न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी भारताबाहेर गेल्याचे दिसत आहे. न्यासाही मित्रांसोबत न्यू इयर पार्टी एन्जॉय करण्यासाठी दुबईला गेली आहे. त्या वेळेचा हा व्हिडिओ असल्याचे समोर आले आहे. तर हा व्हिडिओ तिने स्वतः शेअर न करता तिचा सेलिब्रिटी मित्र ओरहान अवत्रामणीने शेअर केले आहे. या व्हिडिओमध्ये नास्यासोबत (Nysa Devgan) ओरहान आणि त्याची मैत्रीण तान्या श्रॉफ पार्टी करताना दिसत आहेत. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

 

व्हिडिओमध्ये दिसत आहे की तान्याच्या हातात दारूचा ग्लास दिसतोय.
तर न्यासाचा ग्लास खाली टेबलवर दिसत आहे आणि हे दोघे बेधुंद होऊन डान्स करताना दिसत आहेत.
लवकरच न्यासा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
पण न्यासा सध्या स्वित्झर्लंडमधील ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशनमध्ये इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचा अभ्यास करत आहे.

 

Web Title :- Nysa Devgan | nysa devgn new year celebration video with friend orhan awratmani tanya shroff goes viral

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूरच्या ट्रेडिशनल ड्रेस मधील हॉट फोटोजने चाहत्यांचे वेधले लक्ष

Chief Ministers Gun Collection | भारतातील 8 मुख्यमंत्र्यांपैकी सगळ्यात महाग बंदुका CM एकनाथ शिंदे यांच्याकडे

Prarthana Behere | ‘बेशरम रंग’ या गाण्यावर ‘या’ मराठी अभिनेत्रीचा हॉट अंदाज; चाहते घायाळ