Pune Crime News | महिलेस गुंगीचे औषध देवुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर 12 लाखाची खंडणी उकळणार्‍यास चंदननगर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | महिलेस गुंगीचे औषध देवुन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करणार्‍यास तसेच महिलेकडून 12 लाख रूपये खंडणी (Extortion Case) स्वरूपात घेणार्‍यास चंदनगर पोलिसांनी (Chandan Nagar Police Station) अटक केली आहे. (Pune Crime News)

 

विरेश यशवंत म्हस्के Viresh Yashwant Mhaske (40, रा. गणेशनगर, वडगाव शेरी, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फेब्रुवारी 2019 मध्ये आरोपी विरेश म्हस्केने पिडीत महिलेला नाष्टयामधून गुंगीचे औषध देवुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते (Crime Against Woman). पिडीत महिलेस मुलगी झाल्यानंतर तिला वडिलांचे नाव देण्यासाठी आरोपीने पिडीतेकडे 20 लाख रूपयाच्या खंडणी मागणी केली. 12 लाख रूपयाचे लोन पिडीत महिलेच्या नावावर घेवुन ते पैसे आरोपीने स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करून घेतले होते. पिडीतेने चंदननगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली होती. (Pune Crime News)

 

चंदननगर पोलिस आरोपी विरेश म्हस्केचा शोध घेत होते. पोलिस अंमलदार शिवाजी धांडे आणि नामदेव गडदरे यांना तांत्रिक विश्लेषणाव्दारे तसेच गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी हा खांदवे नगर (Khandve Nagar Pune) परिसरात लपुन बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन आरोपीला अटक केली आहे.

पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate), सहाय्यक पोलिस आयुक्त संजय पाटील (ACP Sanjay Patil) यांच्या सुचनेप्रमाणे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Sr PI Rajendra Landge), पोलिस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर (PI Jagannath Jankar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अरविंद कुमरे (PSI Arvind Kumre) ,
पोलिस उपनिरीक्षक दिलीप पालवे (PSI Dilip Palve), पोलिस अंमलदार सुहास निगडे,
सचिन रणदिवे, अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, शिवाजी धांडे, महेश नाणेकर, नामदेव गडदरे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, शेखर शिंदे,
सुभाष आव्हाड, विकास कदम आणि गणेश हांडगर यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक संगिता काळे करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Man arrested by Chandannagar police for extorting
Rs 12 lakh ransom after sexually assaulting a woman

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Major General Smita Devrani and Brigadier Amita Devrani Receive Prestigious National Florence
Nightingale Awards for Exemplary Service in Nursing

Unveiling the Truth: Atal Bihari Vajpayee, the Right Man in the Right Party

C-DAC Collaborates with Bharati Vidyapeeth (Deemed to be University) College of Engineering,
Pune, to Introduce New Technical Courses

Lonavla Residents Duped in Chardham Yatra Scam: 37 Victims Seek Justice

Autorickshaw Driver Arrested for Stealing Temple Bell: Kondhwa Police Crack the Case

India Takes Flight: Pioneering Female Representation among Commercial Pilots Globally