Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : मार्केटयार्ड पोलिस स्टेशन – हॉटेलमध्ये झिंगाट झालेल्या महिलेचा धिंगाणा ! दारुच्या नशेत टाकत होती लोकांच्या जेवणात पाणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हॉटेलमध्ये जेवणासाठी भाकरी न मिळाल्याने दारुच्या नशेत कामगारांना शिवीगाळ करुन लोकांच्या जेवणात पाणी टाकण्याचा प्रकार एका महिलेने केला. पोलिस आले असताना महिला पोलिसांना (Pune Police) शिवीगाळ करुन त्यांच्या हाताचा अंगठा पिरगाळून चावा घेण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी (Marketyard Police) एका महिलेला अटक केली आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी 45 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी महिला पोलीस नाईक वनिता माने यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १०६/२३) दिली आहे. ही घटना मार्केटयार्डमधील श्री सागर हॉटेल व मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री अकरा वाजता घडली. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, श्री सागर हॉटेल येथे आरोपी महिला जेवण करण्यासाठी गेली होती. तेथे जेवणात भाकरी न मिळाल्याने दारुच्या नशेत तिने हॉटेलमधील कामगार व मॅनेजर यांना शिवीगाळ करुन जोरजोरात आरडाओरडा केला. हॉटेलमध्ये आलेल्या इतर लोकांच्या जेवणात पाणी टाकत होत्या. ही बाब हॉटेल मॅनेजर याने पोलिसांना कळविली. पोलीस हॉटेलमध्ये गेले. त्यांनी या महिलेला समजावून सांगत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात आणले. तेथे तिने फिर्यादी यांना “माने का तू, मी कोण आहे ते तुला दाखवतेच,” असे म्हणून फिर्यादीची नेमप्लेट जोरात ओढून शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. उजव्या हाताचे अंगठ्यास पकडून पिरगळुन चावा घेऊन जखमी केले. पोलिसांनी तिला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे (API Kamble) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime News | Marketyard Police Station – The woman who was raped in the hotel! Drunken people were throwing water in their food

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Dagdusheth Ganpati | दगडूशेठ गणपती : श्री गणेश व देवी शारदा यांचा शारदेश मंगलम् विवाह सोहळा थाटात

PM Kisan Samman Nidhi | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना लाभ – कृषि आयुक्त सुनील चव्हाण

Maharashtra Tourism – MTDC | पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी; 15 मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन