Pune Crime News | मार्केटयार्ड : मॅनेजरनेच घातला गंडा; विक्री झालेल्या मालाचे पैसे स्वत:च्या गुगल पेवर घेतले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अनेकदा व्यवस्थापकावर विश्वास ठेवून त्याच्यावर सर्व कारभार सोपविला जातो. पण अनेक जण या विश्वासाला तडा देऊन अफरातफर करतात. आता तर ऑनलाईन पेमेंट (Online Payment) घेण्याची सोय झाल्याने अशा अफरातफरीत दिवसेदिंवस वाढ होऊ लागली आहे. व्यवस्थापक म्हणून नेमलेल्यानेच ३९ लाख १३ हजार रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

 

याप्रकरणी एका ५२ वर्षाच्या महिलेने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात Market Yard Police Station (गु. रजि. नं. ९२/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शिवाजी प्रभु कठारे Shivaji Prabhu Kathare (रा. बालाजीनगर, धनकवडी) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार बिबवेवाडी येथील पेट्स गॅलरी शॉपमध्ये २१ एप्रिल २०२० पासून आतापर्यंत घडला. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांचे पेट्स गॅलरी हे दुकान असून तेथे शिवाजी कठारे याला व्यवस्थापक म्हणून नेमण्यात आले होते. त्याने फिर्यादीचे दुकानावर येणारे व विक्री झालेल्या मालाची अफरातफर दुकानवर विक्री झालेल्या मालापैकी १ कोटी ४ लाख ६३ हजार ७९९ रुपयांचे बिल गुगल पेद्वारे (Google Pay) त्याच्या अ‍ॅक्सीस बँकेच्या (Axis Bank) खात्यावर घेतले. त्यापैकी त्याने ६५ लाख ५० हजार २०८ रुपये फिर्यादीचे मुलीचे व फिर्यादीचे कंपनीच्या खात्यावर व रोख स्वरुपात दिले. उर्वरित ३९ लाख १३ हजार ५९१ रुपये स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन फिर्यादीचा विश्वासघात केला. पोलीस उपनिरीक्षक भोसले (Sub-Inspector of Police Bhosale) तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Marketyard: The manager himself put the money;
The money for the sold goods was taken to their own Google Pay

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा