Pune Crime News | हिंजवडी परिसरात विवाहीतेचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | हिंजवडी येथील एका आयटी कंपनीसमोरील (IT Company, Hinjewadi) फुटपाथवर पतीनेच पत्नीचा धारदार चाकूने भोसकून तिचा खून (Murder in Pune) केला. (Pune Crime News)

 

सविता नामदेव राठोड (वय ३०) असे खून (Pune Murder News) झालेल्या पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी संशयित आरोपी पती नामदेव राठोड (वय ३५, मूळ रा. सांगली, सध्या रा. हिंजवडी) याला ताब्यात घेतले. ही घटना हिंजवडी फेज ३ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हिंजवडी पोलीस ठाण्याच्या (Hinjewadi Police Station) दरम्यान फुटपाथावर शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे सांगली येथील असलेले राठोड दाम्पत्य सध्या हिंजवडी येथे वास्तव्यास आहे. आरोपी नामदेव याला दारूचे व्यसन आहे. शनिवारी रात्री त्याने दारूच्या नशेत पत्नी सविता हिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सविता यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पतीला ताब्यात घेतले आहे.

 

Web Title :  Pune Crime News | Matrimonial murder in Hinjewadi area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा