Pune Crime News | अल्पवयीन मुलींना फुस लावून शारीरीक संबंध ठेवून केले गर्भवती; पोस्को अंतर्गत एकाच दिवशी तीन गुन्हे दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीला फुस लावून तिला लग्नाचे आमिष दाखवून (Lure of Marriage) तिच्याशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवल्याने या अल्पवयीन मुली गर्भवती (Minor Girls Pregnant) राहिल्या. त्यातून हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी एका दिवशी पोस्को अंतर्गत (POSCO ACT) ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. (Pune Crime News)

याबाबत गणेश पेठेत राहणार्‍या एका १७ वर्षाच्या मुलीने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २५८/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रमोद महादेव ठोबळे Pramod Mahadev Thoble (वय २८, रा. महात्मा फुले पेठ) याला अटक केली आहे. फिर्यादी आणि आरोपी प्रमोद यांची ओळख होती. त्यातून फिर्यादीच्या घरी कोणी नसताना एप्रिल महिन्यात प्रमोद तिच्या घरी आला. तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. त्यातून ही मुलगी ३ महिन्यांची गर्भवती राहिल्याचे लक्षात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसर्‍या घटनेत एका १५ वर्षाच्या मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद
(गु. रजि. नं. १९५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अशोक अनिल काळे Ashok Anil Kale
(वय १९, रा. अंबिका झोपडपट्टी) याला अटक केली आहे. आरोपी हा फिर्यादीचा नातेवाईक आहे.
त्याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर ऑगस्ट २०२२ ते मार्च २०२३ दरम्यान शारीरीक संबंध ठेवले.
त्यातून ही मुलगी आता ८ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे. (Pune Crime News)

महंमदवाडी येथे राहणार्‍या एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद
(गु. रजि. नं. ३४४/२३) दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी गणेश वाघमारे (वय २०, रा. चंदननगर) याच्यावर गुन्हा दाखल
केला आहे. फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या बहिणीस गणेश वाघमारे याने मे २०२३ ते २७ जुन २०२३ दरम्यान वेळोवळी
लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरीक संबंध केले. त्यातून ती दीड महिन्यांची गर्भवती राहिल्याचे आढळून आले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Rain Update | पुढील 5 दिवस जोरदार पाऊस; आज मुंबईसह पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’