Maharashtra Rain Update | पुढील 5 दिवस जोरदार पाऊस; आज मुंबईसह पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | अनेक दिवसापासून राज्यात पावसाने (Maharashtra Rain Update) धुमाकूळ घातला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह (Western Maharashtra) मराठवाडा (Marathwada), विदर्भात (Vidarbha) देखील पावसाने जोर घेतला आहे. विदर्भात सध्या अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील अनेक भाग पाण्याखाली गेला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कोकणासह (Konkan) विदर्भातील काही जिल्ह्यातील नागरिकांना या मुसळधार पावसाचा (Heavy Rain) मोठा फटका बसला. आता पुढील पाच दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिला आहे.

हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, आज (मंगळवार) कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain Update) इशारा देण्यात आला. आज मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. तर पुणे आणि सातारा (Pune And Satara) जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे संपूर्ण विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.

मराठवाड्यात देखील पावसाची दमदार बँटिंग सुरू आहे. दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. हिंगोली शहर कळमनुरी यासह जिल्ह्यातील इतर ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेती पिकांना मोठा फायदा होणार आहे.

लातूर जिल्ह्यात मुसळधार

लातूरसह (Latur) जिल्ह्याभरात आज पावसाने दोर पकडला आहे. औराद शहाजानी परिसरात संध्याकाळी जोरदार पाऊस पडला असून दीड तासात 60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. लातूर-जहिराबाद महामार्गावरील पूल वाहून गेल्याने ३
तासांसाठी वाहतूक बंद होती. अनेक गावांना जोडणाऱ्या छोट्या मोठ्या पुलावरूनही पाणी आल्याने वाहतूक ठप्प होती.

यवतमाळ जिल्ह्यात पिकांना फटका

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. सततचा पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 2 लाख 37 हजार हेक्टरवरील शेतजमीन आणि पिके बाधित झाली आहेत.

आज खडकवासला साखळी प्रकल्पात 59.03 टक्के म्हणजेच 17.21 टीएमसी (TMC) एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.
गतवर्षी याच दिवशी धरण प्रकल्पात 20.48 टीएमसी (70.28 टक्के) पाणीसाठा होता.
त्या तुलनेत सध्या 3.27 टीएमसी पाणीसाठा कमी आहे.

खडकवासला धरण 82 टक्के भरले आहे. मात्र, धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ
होत आहे.
त्यामुळे येत्या 24 ते 48 तासांत खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात (Mutha River Basin) पाणी सोडले जाण्याची दाट शक्यता आहे.
यामुळे नदीपात्रात कोणीही प्रवेश करू नये तसेच नदीपात्रात तत्सम साहित्य किंवा प्राणी आढळल्यास ते तातडीने हलवावेत,

असे आवाहन पाटबंधारे विभागाने (Irrigation Department) केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Water News | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता संपली, खडकवासला धरण 82 टक्के भरले