Pune Pimpri Chinchwad Police News | ‘देने वाला जब भी देता देता छप्पर फाड़कर’ ! पोलिस उपनिरीक्षकाला मिळाले कोटयावधी, जाणून घ्या नेमकं काय झालं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Police News | पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एका पोलिस उपनिरीक्षकास ड्रीम 11 (Dream 11) चं तब्बल 1.5 कोटी रूपयांचं बक्षिस लागलंय. त्यामुळे त्या पीएसआयचं नशीबच बदललं जाणार आहे. सोमवाना झेंडे (PSI Somnath Zende) असं त्या पोलिस उपनिरीक्षकाचं नाव असून ते सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या मुख्यालयात कर्तव्य बजावित आहेत. (Pune Pimpri Chinchwad Police News)

याबाबत अधिक माहिती अशी की, बांग्लादेश विरूध्द इंग्लंडच्या क्रिकेट मॅचवर त्यांनी ड्रीम इलेव्हन टीम लावली होती. त्यामध्ये ते करोडपती झाले आहेत. त्यांना तब्बल दीड कोटी रूपयांचं बक्षिस लागलंय. त्यांनी गेल्या 2-3 महिन्यांपासुन ड्रीम 11 खेळण्यास सुरूवात केली. त्यांना दीड कोटीचं बक्षिस लागल्यानं त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Pune Pimpri Chinchwad Police News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यात घरफोडी करणाऱ्या परराज्यातील टोळीला गुन्हे शाखेकडून अटक,
9 लाखांचा मुद्देमाल जप्त; चोरीची पद्धत पाहून पोलिसही चक्रावले

Maharashtra Prison Department | कारागृह विभागातील अधिक्षकांची पदोन्नती