ACB Trap Case News | शेतीची खाते फोड करुन देणारा खाजगी पंटर अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : ACB Trap Case News | शेतीची खाते फोड करण्याच्या मोबदल्यात शिंदखेडा तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नावाने लाच स्वीकारणाऱ्या खाजगी पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. रितेश पवार (वय 30, रा. पाटण ता शिंदखेडा जि. धुळे) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.10) शिंदखेडा तहसील कार्यालयाच्या आवारात केली. (ACB Trap Case News)

याबाबत 47 वर्षाच्या व्यक्तीने धुळे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या कौटुंबिक जमिनीची वाटणी करायची असल्याने खातेफोड होणेबाबत त्यांनी तहसील कार्यालय, शिंदखेडा येथे विनंती अर्ज सादर केला होता. त्या अनुषंगाने तक्रारदार यांनी वेळोवेळी नायब तहसीलदार यांच्याशी भेटून खातेफोड कामी पाठपुरावा सुरू केला होता. दरम्यान आरोपी रितेश पवार याने तक्रारदार यांची भेट घेऊन घेतली. त्याने नायब तहसीलदार तसेच तहसील कार्यालयातील इतर कर्मचारी यांची ओळख व प्रभाव असल्याचे सांगून त्यांना देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती 14 हजार रुपये देण्याचे ठरले. (ACB Trap Case News)

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता रितेश पावर याने पंचांसमक्ष 20 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ठरलेली 14 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. त्याच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी,
वाचक पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील,
पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस अंमलदार राजन कदम, मुकेश अहिरे,
प्रवीण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, चालक सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्स आहे म्हणत पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला 18 लाखांचा गंडा

Pune PMC News | घरातील खराब गाद्या, उश्या, फर्निचर, ई- कचरा टाकायची चिंता सोडा ! महापालिका 14 ऑक्टोबरपासून हा कचरा गोळा करण्यासाठी तुमच्या भागात राबवतेय विशेष मोहीम