Pune Crime News | वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हातभट्टीवाल्या गुन्हेगारावर MPDA ची कारवाई

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आत्तापर्यंतची 21 वी स्थानबध्दतेची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या (Warje Malwadi Police Station) हद्दीत गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार लखन मुन्ना बिरे (26, रा. श्वेता हाईट्स, वारजे जकात नाका, पुणे) याच्यावर पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (MPDA Act) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. त्याची 1 वर्षाकरिता कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहात (Kolhapur Kalamba Central Jail) रवानगी करण्यात आली आहे. (Pune Crime News )

लखन मुन्ना बिरे (Lakhan Munna Bire) हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Pune Police Record) आहे. त्याने वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत जबरी चोरी, गंभीर दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्याविरूध्द 5 गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. त्याच्या भितीमुळे नागरिक त्याच्याविरूघ्द तक्रार करण्यास धजावत नव्हते. (Pune Crime News )

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी लखन बिरे याच्याविरूघ्द एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केलेली आहे. पोलिस आयुक्तांनी पदभार स्विकारल्यापासुन आतापर्यंत 21 सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. आगामी काळात देखील सराईत गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई होणार आहे.

Web Title :  Pune Crime News | MPDA action against notorious criminals in Warje Malwadi police station limits

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nashik NCP News | नाशिकमध्ये संघर्ष पेटला, भूजबळ-अजित पवार-शरद पवार समर्थक आमने-सामने; पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरुन राडा

Ajit Pawar | ‘म्हणून मी सरकारमध्ये आलो…’, कॅबिनेटनंतर अजित पवारांच्या विधानाची चर्चा

Actor Ajay Devgn | अभिनेता अजय देवगनची मुंबईमध्ये प्राईम लोकेशनला मोठी गुंतवणूक; किंमत ऐकून व्हाल धक्क

Actress Janhvi Kapoor | अभिनेत्री जान्हवी कपूर पापाराझींसमोर करत होती अंग झाकण्याचा प्रयत्न; फोटो व्हायरल

Maharashtra Politics News | बहुमत असताना राष्ट्रावादीला सत्तेत का घेतलं? शिवसेना नेत्याने सांगितले कारण

Actress Ameesha Patel | बॉलीवुडच्या एका निर्मात्यासोबतच्या अफेअरने बर्बाद केले अमिषा पटेलचे पूर्ण करिअर; आता होतोय पश्चाताप

Actress Rekha | अभिनेत्री रेखा यांनी 10 वर्षे का स्विकारली नाही कोणत्याही चित्रपटाची ऑफर? रेखाजींनी दिले उत्तर

Maharashtra Cabinet Decision | राज्याचे ग्रीन हायड्रोजन धोरण जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य; अजित पवार उपमुख्यमंत्री होताच पहिली कॅबिनेट बैठक, घेतले 8 महत्त्वाचे निर्णय