Pune Crime News | नारायण पेठ : 20 लाखांचे 5 कोटी करुन देण्याच्या नावाखाली महिलेला घातला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune Crime News | २० लाख रुपयांचे ५ कोटी रुपये करुन देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला पुजापाट करुन तब्बल २० लाख रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत नारायण पेठेत राहणार्‍या ४२ वर्षाच्या एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २१४/२३) दिली आहे. त्यानुसार तनवीर शामकांत पाटील, शिवम गुरुजी, सुनिल राठोड आणि आनंदस्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नारायण पेठेतील पटवर्धन गड अपार्टमेंटमध्ये ९ ऑगस्ट ते २५ सप्टेबर २०२३ दरम्यान घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बँकांकडून फायनान्स करुन देण्याचे व रिअल इस्टेटचे (Real Estate) काम करतात. फिर्यादी यांचे व्यावसायिक भागीदार यांच्या प्लॉटचे व्यवहारानिमित्त दोन महिन्यांपूर्वी तनवीर पाटील याच्यासोबत ओळख झाली होती. पाटील याने त्यांना आमचे एक गुरुजी आहेत, त्यांनी ५ लाखांचे ७५ लाख रुपये करुन दिल्याचे सांगितले. त्यांनी या गुरुजीची भेट करुन दिली. तेव्हा त्यांनी आनंदस्वामी यांची भिलारवाडी येथील एका फ्लॅटमध्ये भेट करुन दिली. तेव्हा त्यांनी १५ लाखांपेक्षा अधिक पैसे लावा, ५ कोटी रुपये करुन देतो, असे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी २० लाख रुपये जमवले.

१३ सप्टेबर रोजी आरोपींनी एका २०० लिटरच्या बॅरलमध्ये २० लाख रुपये टाकण्यास सांगितले.
त्यानंतर रुमची लाईट बंद करुन रुममध्ये धुर केला. त्यांना रुमचे बाहेर काढले. त्यानंतर १० मिनिटांनी ते रुमच्या बाहेर आले.
रुमला लॉक करुन फिर्यादीस ते हरिद्वार येथे जाऊन पूजा करुन आल्यानंतर २० लाखांचे १२ दिवसात ५ कोटी रुपये होतील,
असे सांगून ते निघून गेले. २५ सप्टेबर रोजी १२ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तनवीर पाटील याला वारंवार फोन करुन
रुम उघडण्यासाठी स्वामीजी कधी येणार आहेत, अशी विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले.
त्यांना संशय आल्याने त्यांनी रुम उघडून बॅरलमध्ये पाहिले असता बॅरलमध्ये पैसे नसल्याचे दिसून आले.
त्यानंतर फिर्यादी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक बरुरे (PSI Barure) तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Heart Health : हृदयाची घ्यायची असेल चांगली काळजी, तर आजच ताटात या सुपर फूड्सचा करा समावेश, नेहमी राहाल निरोगी

Capsicum Side Effects | Capsaicin युक्त शिमला मिरची जरा सांभाळून खा, जास्त खाल्लास आरोग्याचे होईल असे नुकसान