Heart Health : हृदयाची घ्यायची असेल चांगली काळजी, तर आजच ताटात या सुपर फूड्सचा करा समावेश, नेहमी राहाल निरोगी

नवी दिल्ली : Heart Health | हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी एक प्राथमिक मार्ग निरोगी आहाराचा अवलंब करणे. योग्य पदार्थांसह हृदयाचे पोषण करता येते. खाण्‍याच्‍या सवयी सुधारल्‍याने हृदयाशी (Heart Health) संबंधित आजारांपासून दूर राहता येते.

१- ओमेगा – ३ फॅटी अ‍ॅसिड
ओमेगा -३ फॅटी अ‍ॅसिडमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीतील सूज कमी होते, हृदयाचे ठोके नियंत्रित होतात, रक्त गोठणे कमी होते आणि रक्तदाब कमी होतो. यासाठी मासे ( रोहू, कटला आणि मॅकरेल) आणि सीड्स जसे की आळशी, सब्जा, चिया सीड्स आणि अक्रोड.

२- शरीरातील ट्रांन्स फॅट कमी करा
हृदयाच्या आरोग्यासाठी ट्रांन्स फॅटचे सेवन मर्यादित करा. रेड मीट, लोणी, चीज आणि प्रोसेस्ड फूड टाळा. हे रक्तप्रवाहात एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढवू शकतात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक तयार होते, ज्यामुळे एथेरोस्क्लेरोसिस, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

३- जास्त फायबरचे सेवन करा
डाएट्री फायबर, विशेषत: सोल्यूबल फायबर, कोलेस्ट्रॉलला पचनमार्गात बांधू शकते आणि त्याचे उत्सर्जन सुलभ करते. ज्यामुळे रक्तातील एलडीएल (खराब) कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. या क्रिया धमनी प्लेक रोखण्यास, एथेरोस्क्लेरोसिस, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी करते. धान्य, फळे, भाज्या आणि शेंगांमध्ये फायबर मुबलक असते. फायबर हृदयाचे आरोग्य वाढवते.

४- मीठाचे सेवन
हृदय निरोगी ठेवण्यासाठी मीठाचे सेवन करताना विशेष काळजी घ्या. कारण त्याच्या अतिसेवनाने बीपीची समस्या होते. त्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

५- गोड पदार्थ आणि पेये मर्यादित घ्या
गोड पदार्थ आणि पेये मर्यादित ठेवणे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. जास्त साखरेचे सेवन केल्याने वजन
वाढू शकते, सूज होऊ शकते. टड्ढायग्लिसराइडचे प्रमाण वाढते. जास्त साखरेचे सेवन इंसुलिन प्रतिरोधक आणि टाईप
२ डायबिटीज, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या गुंतागुंतांशी संबंधित स्थितीमध्ये योगदान देते.
गोड पदार्थ आणि पेयामुळे रक्तवाहिन्या कडक होणे आणि अरुंद होणे, हृदयविकाराचा झटका आणि स्टड्ढोकचा धोका वाढतो.
कमी साखर असलेल्या आहाराला प्राधान्य देणे हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य राखण्यासाठी एक सक्रिय पाऊल आहे.

६- अँटिऑक्सिडेंट समृध्द पदार्थांचा समावेश करा
हृदयाच्या आरोग्यासाठी आहारात अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा समावेश करा. अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री
रॅडिकल्सला निष्क्रीय करून ऑस्किडेटीव्ह तणावाशी लढा देतात. हे तंत्र हृदयविकाराची सुरुवात आणि प्रगती रोखते.
आवळा, जांभूळ, बदाम आणि अक्रोड सारख्या सुक्या मेव्यासह पालक, मेथी, आणि मोहरीत याचा समावेश असतो.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Pollution Department Notice To Baramati Agro | मध्यरात्री 2 वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई ! बारामती अ‍ॅग्रो 72 तासात बंद करण्याची सूचना; दोन बड्या नेत्यांवर आरोप

Pune ACB Trap News | कॉन्ट्रॅक्टर कडून लाच घेताना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात