पुण्यातील मंगळवार पेठेत डॉल्बी सिस्टीम अन् रिक्षा जाळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मंगळवार पेठेत पार्क केलेल्या रिक्षा शेजारी ताडपत्रीने झाकून ठेवलेले डॉल्बीचे साऊंड जाळून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी पहाटे हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी आसिफ तांबोळी (वय 32, रा. मंगळवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दत्तात्रय भंडारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे राहण्यास येथील म.न.पा कोठीच्या गेट परिसरात आहेत. त्यांनी त्यांची रिक्षा येथे संताजी घोरपडे पेठवर पार्क केली होती. त्यांच्या शेजारीच अझरूद्दीन सय्यद यांनी त्यांचे डॉल्बीचे दोन साऊंड व दोन बेस ताडपत्रीत झाकून ठेवले होते. त्यावेळी आरोपीने कशाच्या तरी सह्याने त्याला आग लावली. या आगीत रिक्षा आणि साऊंड जळून खाक झाले असून, यात 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार समरो आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.