Travels Ticket | तिकीट दरवाढ ! सणासुदीच्या काळात ट्रॅव्हल्स कंपन्यांनी केली दुप्पट भाडे वाढ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Travels Ticket | ऐन सणासुदीच्या काळात ट्रॅव्हल्स कंपन्याचा (Travel Company) मनमानी कारभार समोर आला आहे. गणपती, महालक्ष्मीसाठी (Ganesh Utsav 2023) अनेकजण आपल्या गावी जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सने (Private Travel) जात असतात. याचाच फायदा घेऊन खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीट दरात (Travels Ticket) दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. मनमानी पद्धतीने तिकीट आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या चालकांवर राज्याच्या परिवहन विभागाकडून (State Transport Department) कारवाईचा ईशारा दिला आहे. मात्र, त्याला न जुमानता ट्रॅव्हल्स कंपनीकडून तिकीटाच्या दरात दुप्पट वाढ केली आहे. एसटी (ST Bus), रेल्वेच्या (Railways) सर्व जागा आरक्षित झाल्याने गावी जाण्यासाठी खासगी बसचा पर्याय असल्याने ट्रॅव्हल्स कंपन्यांनी तिकीट दरात दुप्पट भाडेवाढ केली आहे.

नोकरी, कामधंद्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यात येत असतात. गणेशोत्सवासाठी लोक आपल्या गावी जात असतात. पुण्यातून दररोज सुमारे 900 पेक्षा अधिक ट्रॅव्हल्स महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जात असतात. यामध्ये मराठवाडा (Marathwada) व विदर्भात (Vidarbha) जाणाऱ्या गाड्यांची संख्या सर्वाधिक आहे. काही प्रवाशांनी आधीच बुकिंग केल्यामुळे आता उर्वरित जागांसाठी ट्रॅव्हल्स चालकांकडून भाडे वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गणेश भक्तांचा प्रवास चांगलाच महागला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दर वर्षीप्रमाणे यंदाही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, कारवाई किरकोळ स्वरुपात होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे.

राज्य परिवहन महामंडळाने प्रवासी संवर्गातील बसच्या टप्पा वाहतुकीचे भाडे निश्चित केले आहे.
त्यानुसार खासगी वाहने किंवा ट्रॅव्हल्सचे तिकीट ठरविण्यात आले आहे.
एसटीच्या तिकीटापेक्षा 50 टक्क्यांपर्यंत अधिक रक्कम आकारण्यास ट्रॅव्हल्सला परवानगी (Travels Ticket) दिली आहे.
परंतु काही ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या चालकांनी 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ केली आहे.

या ठिकाणी तक्रार करा

प्रवासादरम्यान जादा तिकिटाची रक्कम घेतल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी
आरटीओकडे ई-मेल किंवा कार्यालयीन वेळेत आरटीओ कार्यालयाकडे 20-26058080 किंवा 020-26058090 या
क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच [email protected] या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Chinchwad Court | पिंपरी चिंचवड न्यायालयासाठी बांधण्यात येणार नवीन इमारत; कोट्यवधी रुपयांची मंजुरी