Pune Crime News | व्यवसाय होत नसल्याच्या रागातून लॅबची तोडफोड करून एकाला मारहाण, कोंढव्यातील घटना; तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | व्यवसाय कमी होत असल्याने लॅब चालकाने प्रतिस्पर्धी लॅब चालकाच्या लॅबची तोडफोड केली. तसेच लॅबमध्ये ब्लड टेस्ट (Blood Test) करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला धारदार हत्याराने हातावर मारहाण (Beating) करुन गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि.23) रात्री पावणे दहाच्या सुमारास कोंढवा येथील सोमली चौकातील पुना डायग्नोस्टिक सेंटर (Puna Diagnostic Center Kondhwa) येथे घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Pune Police) मेडिको लॅबच्या (Medico Lab) मालकासह तिघांना अटक केली आहे. (Pune Crime News)

याबाबत मारुती दत्तु चव्हाण (वय-21 रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बु. पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष सुरेश दुधणीकर Ashish Suresh Dudhanikar (वय-24), धीरज लहु धेले Dheeraj Lahu Dhele (वय-19 दोघे रा. साई निवास, गोकुळनगर, कोंढवा) आणि मेडिको लॅब चा मालक अक्षय प्रताप निकम Akshay Pratap Nikam (वय-24 रा. गणपती मंदिरासमोर, गोकुळनगर, कोंढवा) यांच्यावर आयपीसी 326, 506, 427, 34 सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मारुती चव्हाण हे कोंढवा परिसरातील पुना डायग्नोस्टिक सेंटरमध्ये काम करतात. तर आरोपी अक्षय निकम याची याच परिसरात मेडिको नावाची लॅब आहे. मात्र, फिर्यादी काम करत असलेल्या लॅबमुळे निकम याचा व्यवसाय कमी होत असल्याने त्याच्या मनात राग होता. त्यामुळे निकम याने आशिष आणि धिरज यांना पुना डायग्नोस्टिक सेंटर येथे पाठवले. त्यावेळी लॅबमध्ये मुलाची ब्लड टेस्ट करण्यासाठी आलेले सुरेश साह यांना कोणतेही कारण नसताना आरोपींनी धारदार हत्याराने त्यांच्या हातावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच लॅबची तोडफोड करुन नुकसान केले. (Pune Crime News)

आरोपी अक्षय निकम याने फिर्य़ादी यांच्या लॅबचे मालक योगेश घोडके व इतरांना धंदा नीट करायचा, तुमच्यामुळे
माझ्या लॅबचा धंदा कमी होत आहे. तुम्हाला घाबरवण्यासाठी मुले पाठवून मारहाण केल्याचे म्हटले.
तसेच तुम्ही माझ्या व्यवसायाच्या आड आला तर पाहून घेईन अशी धमकी दिली.
मारुती चव्हाण यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन
तिघांना अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | रिकाम्या टाकीत गॅस भरताना स्फोट, एकजण जखमी; कोथरुडमधील घटना, दोघांवर FIR

Pune Crime News | घरमालकाला गुंगीचे औषध देऊन नोकरांचा पैशावर डल्ला, औंध परिसरातील घटना

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | जरांगेंचे आमरण उपोषण पुन्हा सुरू, म्हणाले – ‘सरकार जाणूनबुजून मराठा समाजाची दिशाभूल करतंय’