Pune Crime News | पाटस येथील दुहेरी हत्याकांडातील 4 आरोपी गजाआड, पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

पाटस : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – दौंड तालुक्यातील पाटस येथे दोन तरुणांची तलवारीने वार करुन तसेच डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या (Murder in Patas) करण्यात आली. ही घटना रविवारी (दि.4) रात्री साडे दहाच्या सुमारास तामखडा भागात घडली होती. या प्रकरणातील चार आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (Pune Rural Police Local Crime Branch) अटक (Arrest) केली आहे. शुभम संतोष शितकल Shubham Santosh Shitkal (वय-23), गणेश रमेश माकर Ganesh Ramesh Makar (वय-23) असे खून (Murder in Patas) झालेल्या तरुणांची नावे आहेत.

Devendra Fadanvis | ’12 नव्हे 106 आमदारांचे निलंबन केले तरी चालेल, पण OBC मुद्यावर बोलत राहणार’ (व्हिडिओ)

Pune Crime News | Performance of 4 accused Gajaad, Pune Rural LCB Squad in Patas double murder

महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय -22 रा.पाटस, तामखडा ता.दौंड जि.पुणे), महेश मारुती टुले (वय-20 रा.पाटस, तामखडा ता.दौंड जि.पुणे), युवराज रामदास शिंदे (वय-19 रा.गिरीम, मदनेवस्ती ता.दौंड जि.पुणे, गहिनीनाथ बबन माने (वय-19 रा.गिरीम, राघोबानगर ता.दौंड जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. आरोपींना ड्रायव्हर ढाबा, बारामती एअरपोर्ट रोड येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपींना पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे .

Pune Corona | दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 150 नवीन रुग्ण, 249 रुग्णांना डिस्चार्ज

शुभव शितकल व गणेश माकर यांना आरोपी मन्या उर्फ महेश याने मोबाईलवरुन शिवीगाळ केली. तसेच वाद झाला होता. त्याचा जाब विचारण्यासाठी शुभम आणि गणेश हे तामखडा येथे गेले होते. त्यावेळी आरोपींनी दोघांवर हल्ला केला. तलवारीने वार करीत डोक्यात दगड घालून दोघांचा निर्घृण खून केला. घटनेनंतर आरोपी फरार झाले. या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पोलिसांनी करुन आरोपींना अटक केली आहे.

State Government । ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! कोरोनामुक्त भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख (Superintendent of Police Dr.
Abhinav Deshmukh), अपर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते (Additional
Superintendent of Police Milind Mohite), दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल
धस (Daund Sub-Divisional Police Officer Rahul Dhas) यांच्या मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, पोलीस हवालदार महेश गायकवाड, पोलीस हवालदार निलेश कदम, दत्ता तांबे, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, पोलीस नाईक गुरु गायकवाड, अभिजित एकाशिंगे, काशिनाथ राजापुरे, शब्बीर पठाण, विद्याधर निश्चित, प्रमोद नवले, गुरु जाधव यांनी केलेली आहे.

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime News | Performance of 4 accused Gajaad, Pune Rural LCB Squad in Patas double murder

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update