Pune Crime News | सिंहगड रोड परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ ! इमारतीच्या आर्थिंग वायरची चोरी करणार्‍या दोघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ करत इमारतीच्या आर्थिंग वायरची चोरी (Theft Earthing Wire) करणार्‍या दोघांना सिंहगड रोड पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. (Pune Crime News)

 

रविंद्र प्रकाश देशमुख Ravindra Prakash Deshmukh (34, मुळ रा. शाहुनगर, माजलगाव, जि. बीड, सध्या रा. काळुबाई निवास, रूम नंबर 4, वेताळबुवा चौक, नर्‍हेगाव, पुणे) आणि हेमराज शांताराम पाटील Hemraj Shantaram Patil (27, रा. मु.पो. बोळे, ता. पारूळा, जि. जळगाव. सध्या रा. श्री. एव्हेन्यु बिल्डींग, अभिनवय कॉलेज रोड, नर्‍हेगाव, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 12 जुलै 2023 रोजी इमारतीच्या आर्थिंग वारच्या चोरीसंदर्भात पोलिस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल झाला होता. (Pune Crime News)

 

पोलिस आर्थिंग वायरची चोरी करणार्‍यांचा शोध घेत होते. पोलिस अंमलदार देवा चव्हाण आणि पोलिस अंमलदार स्वप्निल मगर यांना आरोपी हे दुर्वाकुर सुष्टी, जेएसपीएम कॉलेज जवळ (JSPM College Pune) पांढर्‍या रंगाच्या वेस्पा गाडीवर नवले ब्रीज खाली थांबले असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचुन आरोपींना अटक केली.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली.
त्यांच्याकडून 30 हजार रूपये किंमतीची आर्थिंगची वायर आणि गुन्हयात वापरलेली मोटारसायकल
असा एकुण 80 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा (IPS Suhail Sharma), सहाय्यक पोलिस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande), वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन (Sr PI Abhay Mahajan), पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर (PI Jayant Rajurkar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam), पोलिस उपनिरीक्षक गणेश मोकाशी (PSI Ganesh Mokashi), पोलिस अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, देवा चव्हाण, स्वप्नील मगर, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, राजाभाऊ वेगरे, दक्ष पाटील, विकास पांडुळे, अमोल पाटील, सागर शेडगे, विकास बांदल आणि अविनाश कोंडे यांच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे.

 

Web Title : Pune Crime News | Playing with the lives of citizens in Sinhagad Road area! Two arrested for stealing earthing wire of building

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा